शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विद्यापीठाच्या येस बँकेत १९१ कोटींच्या ठेवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 21:13 IST

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला फटका बसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देखासगी बँकेत मोठा निधी ठेवलाच कसा?विधिसभेत सदस्य आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने येस बँकेवर घातलेल्या निर्बंधांचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला फटका बसण्याची शक्यता आहे. विद्यापीठाच्या येस बँकेमध्ये थोड्याथोडक्या नव्हे तर १९१ कोटींच्या ठेवी आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांचा पर्याय असताना खासगी बँकेत इतक्या ठेवी ठेवल्यामुळे प्राधिकरण सदस्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या ठेवी काढता आल्या नाहीत तर विद्यापीठाचे व पर्यायाने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.सर्वसाधारणत: विद्यापीठाचा पैसा राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवण्यात येतो. परंतु विद्यापीठाने काही वर्षांअगोदर कोट्यवधींच्या ठेवी राष्ट्रीयीकृत बँकेतून काढून येस बँकेत ठेवल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध घातल्यानंतर शुक्रवारी विधिसभेची बैठक आयोजित करण्यात आली. यात अ‍ॅड. मनमोहन वाजपेयी यांनी हा मुद्दा उचलला. राष्ट्रीयीकृत बँकेत विद्यापीठाने पैसा का ठेवला नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विधिसभेचेच सदस्य असलेल्या जगदीश जोशी यांनी यावर आणखी प्रकाश टाकला. गुंतवणूक समितीच्या बैठकीत कधीही बँकेत किती पैसे ठेवावे यावर चर्चा झाली नाही.२०१६-१७ साली विद्यापीठाच्या ‘करंट अकाऊंट’मध्ये ७० कोटी इतका निधी होता. तो कुठे तरी गुंतवावा असे ठरले होते. राष्ट्रीयीकृत बँकेकडून ‘कोटेशन’घ्या अशी चर्चादेखील झाली होती, असे त्यांनी सांगितले. यादरम्यान वाजपेयी यांनी येस बँकेत नेमका किती निधी आहे याबाबत विचारणा केली. मात्र राष्ट्रीय पातळीवर सर्व खातेदारांना घाम फुटला असताना विद्यापीठाकडे मात्र याची कुठलीही माहिती नव्हती. ही माहिती तपासून मग विधीसभेसमोर सादर करु असे वित्त व लेखा अधिकारी डॉ.राजू हिवसे यांनी सांगितले. दिवसाअखेरीस प्रवीण उदापुरे यांनी ही माहिती सभागृहाला द्या अशी मागणी लावून धरली. अखेर डॉ.हिवसे यांनी येस बँकेत विद्यापीठाच्या १९१ कोटींच्या ठेवी असल्याचे सांगितले. हा आकडा ऐकूनच सदस्यांना हादरा बसला.२०१७ मध्येच झाला होता विरोध२०१७ मध्ये बँक ऑफ इंडियासोबत विद्यापीठाचा वाद झाला होता. त्यावेळी येस बँकेसाठी काही अधिकारी जास्त आग्रही होते. विद्यापीठातील एका महिला अधिकाऱ्याने तर यासंदर्भात जास्तच पुढाकार घेतला होता. एका खासगी बँकेचा येवढा पुळका कशासाठी असा प्रश्न यानिमिताने उपस्थित झाला होता.निवृत्त न्यायमूर्तींची चौकशी समिती नेमाराष्ट्रीयीकृत बँकांचा पर्याय असताना विद्यापीठाने येस बँकेत कोट्यवधींचा निधी कसा काय ठेवला या मुद्द्यावरून सदस्य आक्रमक झाले. डॉ. बबन तायवाडे यांनी हे प्रकरण फार गंभीर असल्याचे म्हणत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींची चौकशी समिती नेमा व दोषींवर कारवाई करा अशी मागणीच केली. यावर कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी जगदीश जोशी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती नेमण्याची घोषणा केली. तसेच येस बँकेतील ठेवी राष्ट्रीयीकृत बँकेत वळविण्यासंदर्भात पावले उचलण्यात येतील, असेदेखील आश्वासन दिले.

 

टॅग्स :bankबँक