शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर मनपाची १८.५० कोटींनी फसवणूक : पोलीस विभागामार्फत चौकशीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 22:10 IST

भांडेवाडी येथील मे. हंजर बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया न करताच बोगस बिलाची उचल करून महापालिकेची १८ कोटी ५० लाखांनी फसवणूक केली. नागपूरच नव्हे तर देशभरातील महापालिका तसेच विदेशातील विविध संस्थांची हंजर व्यवस्थापनाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाची पोलीस विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.

ठळक मुद्देबोगस बिल सादर करून हंजर बायोटेक प्रा.लि.ने रक्कम उचलली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडेवाडी येथील मे. हंजर बायोटेक प्रा. लि. कंपनीच्या प्रकल्पात कचऱ्यावर प्रक्रिया न करताच बोगस बिलाची उचल करून महापालिकेची १८ कोटी ५० लाखांनी फसवणूक केली. नागपूरच नव्हे तर देशभरातील महापालिका तसेच विदेशातील विविध संस्थांची हंजर व्यवस्थापनाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाची पोलीस विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी नगरसेवकांनी केली आहे.नागपूर शहरातून दररोज ११०० ते १२०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. हा कचरा भांडेवाडी डम्पींग यार्ड येथे साठविला जातो. यातील १३० ते १५० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात हंजरचा प्रकल्प व्यवस्थित सुरू नाही. गतकाळात तो बंद पडला होता. असे असतानाही हंजरने बिलाची उचल केलेली आहे. गत काळात प्रकल्पाला आग लागली होती.आगीनंतर व्यवस्थापनाने महापालिकेला कल्पना न देता येथील निरुपयोगी यंत्रसामुग्री परस्पर विक ली. यात महापालिकेची फसवणूक झाली आहे. या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी करण्याची मागणी विधी समितीचे सभापती अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केली आहे. तसेच २० आॅक्टोबरला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा प्रश्न चर्चेसाठी दिला आहे. हंजरने नागपूरसह देश-विदेशातील संस्थांची फसवणूक केल्याचा आरोप असल्याने यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाfraudधोकेबाजी