शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १८ कामगारांना अन्नातून विषबाधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 10:44 IST

बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

ठळक मुद्देमोरारजी टेक्स्टाईल येथील घटना जेवणात आढळली पाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: बुटीबोरी पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील मोरारजी टेक्स्टाईल कंपनीच्या १८ कामगारांना मंगळवारी रात्री अन्नातून विषबाधा झाली. या १८ कामगारांवर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.मोरारजी टेक्स्टाईल कंपनीत आशिष मिश्रा यांच्या दुर्गा गणेश केटरिंग सर्व्हिसला खानावळीचे कंत्राट आहे. या खानावळीत जेवण पुरविणे आणि स्वच्छतेचे काम उमेश पांडे हा बघतो. मंगळवारी रात्री ८.३० वाजताच्या दरम्यान कंपनीचे कामगार जेवण करीत असताना अनिल गिºहे (४२) रा. हिंगणा यांच्या जेवणाच्या ताटातील वरणामध्ये मृत पाल आढळून आली. तोपर्यंत खानावळीत उपस्थित असलेल्या अनेक कामगारांनी जेवण करणे सुरू केले होते. परंतु अनिल गिºहे यांना जेवणात पाल आढळून येताच त्याने इतर सहकारी कामगारांना याबाबत अवगत केले. अन्नात पाल पाहून अनिल याने ओकारी केली. यानंतर इतर कामगारांनीही ओकाऱ्या करायला सुरुवात केली. जवळपास १८ कामगारांना अन्नातून विषबाधा झाली असून, त्यात मनोहर नारायण खंदारे (४२) रा. तुरकमारी, रवींद्र विठोबा निमकर (३३) रा. देवळी आमगाव, रमेश गुरनुले (४० ), ज्ञानेश्वर माहुरे (३८) रा. घोराड, विजय येलूरे (४०) रा. कान्होलीबारा, देविदास कावळे (४८) रा. टाकळघाट, अमोल पांडे (३८) रा. बुटीबोरी, मनोज जिव्हारे(४३) रा. बुटीबोरी, विकास बेलेकर(४४) रा. सातगाव, रमेश करडभाजने (३१) सालईदभा, अजय बनकर (२९) रा. शिरुळ , रामेश्वर बोपचे (३९) रा. बोथली, संजय शरणागत (२९) रा. बुटीबोरी, मोहन नाटेकर (३२) रा. बुटीबोरी, शैलेश ढबाले (२२) रा. सालईदाभा, ज्ञानेश्वर ठाकरे (४०) रा. कान्होलीबारा, दिलीप उरकुडे (४०) रा. कान्होलीबारा यांचा यात समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच बुटीबोरी एमआयडीसीचे ठाणेदार सुनील लांघी ताफ्यासह कंपनीत दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून विषबाधित कामगारांना बुटीबोरी येथील रचना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यातील १० कामगारांना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली. अन्नाचा रासायनिक विश्लेषकाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषीवर गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुनील लांघी यांनी दिली. 

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा