शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

१८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:39 IST

पोलिसांनी कारगाव फाट्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. ट्रकचालकासह अन्य आरोपी मात्र पळून गेले.

ठळक मुद्देआरोपी फरार : भिवापूर पोलिसांची कारगाव फाट्याजवळ कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कभिवापूर : पोलिसांनी कारगाव फाट्याजवळ केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. ट्रकचालकासह अन्य आरोपी मात्र पळून गेले. या कारवाईमध्ये ट्रकमधील ४० जनावरांची सुटका करण्यात आली असून, एकूण १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.भिवापूर परिसरातून ट्रकमध्ये जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती भिवापूर पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी नागपूर - गडचिरोली मार्गावरील कारगाव फाटा परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, गडचिरोलीहून नागपूरच्या दिशेने जाणारा सीजी-२३/बी-०१४५ क्रमांकाच्या ट्रकच्या चालकास समोर पोलीस असल्याचे निदर्शनास येताच त्याने हा ट्रक अलीकडेच काही दूर अंतरावर उभा केला आणि त्याच्यासह अन्य आरोपींनी ट्रक सोडून लगेच पळ काढला.पोलिसांनी या ट्रकची झडती घेतली असता, त्यात ४० जनावरे कोंबली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. ही सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असावी, अशी शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली. पोलिसांनी ट्रकमधील सर्व जनावरांची सुटका करून त्यांना नजीकच्या गोशाळेत पाठविण्याची व्यवस्था केली तसेच ट्रक जप्त केला. या कारवाईमध्ये ट्रक आणि जनावरे असा एकूण १८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी गुन्हा नोंदवून पसार आरोपींचा शोध घेणे सुरू केले आहे.ही कारवाई ठाणेदार हर्षल येकरे यांच्या मार्गदर्शनात कारवाई पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर तिवारी, सहायक पोलीस उपनिरीक्षक दौलत नैताम, चंदू रेवतकर, विनोद झाडे, उमेश झिंगरे, योगीराज वंजारी, प्रकाश मुरकूटे, गोकुळ सलामे, राजन भोयर, विनोद भोयर, अमोल तायडे, सारंग राखडे यांनी पार पाडली.२० जनावरांची सुटकामौदा : पोलिसांनी माथनी शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला. त्यातील २० जनावरांची सुटका करून दोघांना अटक करीत त्यांच्याकडून नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास करण्यात आली. नीलेश टेकराम कुथे (३४) व हंसराज शामराव बोरकर (४०) दोघेही रा. आमगाव, जिल्हा गोंदिया अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मौदा परिसरातून जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच मौदा पोलिसांनी नागपूर - भंडारा महामार्गावरील माथनी शिवारात वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-३५/के-११०५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये २० म्हशी आणि रेडे कोंबले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या जनावरांची वाहतूक ही विनापरवानगी असल्याचे तसेच ही जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चौकशीदरम्यान आढळून येताच पोलिसांनी जनावरांसह ट्रक जप्त करून त्यातील दोघांना अटक केली. या कारवाईमध्ये एकूण नऊ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.