शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील आमदार निवासजवळ १८ लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 00:32 IST

दुचाकीवर मास्क लावून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देदिवसाढवळ्या घटना : सीताबर्डीत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दुचाकीवर मास्क लावून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून कलेक्शन एजन्सीच्या कर्मचाऱ्यांकडून १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड लुटून नेली. सोमवारी दुपारी १.३० च्या दरम्यान आमदार निवासजवळ ही घटना घडली. यामुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ब्रिंगल कंपनी प्रायव्हेट लिमिटेडने विविध शासकीय-निमशासकीय कार्यालयातील तसेच खासगी व्यक्तींकडील रक्कम संकलित करून ती बँकेत अथवा एटीएममध्ये जमा करण्याचे कंत्राट घेतले आहे. कंपनीचे कर्मचारी विविध ठिकाणाहून रोकड गोळा करून ती दररोज बँकेत जमा करतात. नेहमीप्रमाणे श्रीकांत नानाजी इंगळे (वय ३७) आणि सतीश धांदे या दोन कर्मचाऱ्यांनी आज विविध ठिकाणाहून दोन लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रक्कम जमा केली. त्यानंतर ते शंकरनगरातील एलआयसी आॅफिसमध्ये आले. इथून त्यांनी १६ लाखाची रोकड उचलली. अशाप्रकारे एकूण १८ लाख ३१ हजार ४६१ रुपयांची रोकड अ‍ॅक्सिस बँकेत जमा करण्यासाठीइंगळे आणि धांदे एका दुचाकीवर निघाले. आमदार निवासजवळच्या राजाराणी चौकात येताच मागून तीन दुचाकीवर आलेल्या सहा लुटारूंपैकी एकाने लाथ मारून दुचाकीवरील कर्मचाऱ्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळची रोकड असलेली बॅग हिसकावून लुटारू पळून गेले. या घटनेमुळे हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीच्या वरिष्ठांना लुटमारीच्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्ष आणि सीताबर्डी पोलिसांना माहिती कळविण्यात आली. दिवसाढवळ्या घडलेल्या या लुटमारीच्या घटनेमुळे पोलीस प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली. सीताबर्डीचा पोलीस ताफा, परिमंडळ-२ च्या पोलीस उपायुक्त विनीता शाहू, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने आपापल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तेथे पीडित कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. इंगळेच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात सहा आरोपींविरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.कुणी दिली टीप?आरोपींचा छडा लावण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेण्यात आले. एकूणच घटनाक्रमावरून आरोपींना इंगळे आणि धांदेकडे मोठी रोकड असल्याची माहिती आधीपासूनच होती आणि त्यामुळे लुटमारीचा कट आरोपींनी काही दिवसांपूर्वीच रचला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. दरम्यान, इंगळे आणि धांदे हे रोज मोठी रोकड घेऊन दुचाकीने जातात, ही माहिती आरोपींना देणारा कोण, असा प्रश्न उपस्थित झाला असून, या प्रश्नातच या दरोड्याचे उत्तर दडले असल्याचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा दावा आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने लुटारूंचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी चालविला आहे.

टॅग्स :RobberyचोरीMLA Hostelआमदार निवास