शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

१८ कोटींच्या वणी-पाटण रस्ता रुंदीकरणाची संथगती

By admin | Updated: April 11, 2016 02:31 IST

वणी-मुकुटबन-बोरी-पाटण या १८ कोटी ७० लाखांचे बजेट असलेल्या रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे.

यवतमाळ : वणी-मुकुटबन-बोरी-पाटण या १८ कोटी ७० लाखांचे बजेट असलेल्या रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. निविदेतील अटीनुसार बॅचमिक्स प्लॅन्ट लागला नाही. पर्यायाने डांबरीकरण रखडले आहे. नांदेडच्या या कंत्राटदारावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंता मेहेरबान असल्याचे सांगितले जाते. राज्य मार्ग क्र. ३१५ वर वणी ते पाटण या दहा किलोमीटरच्या रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाची केंद्रीय रस्ते निधीतून (सीआरएफ) निविदा काढली गेली. सात कंत्राटदारांनी ही निविदा भरली होती. १९ आॅक्टोबर २०१५ ला निविदा उघडण्यात आल्या. त्यात नांदेड येथील एकलारे यांच्या शारदा कंन्स्ट्रक्शनची १४.५७ टक्के तर उंबरकर-औदार्य संयुक्त कंपनीची ११.९८ टक्के कमी दराची निविदा होती. अखेर शारदा कंस्ट्रक्शनला हे काम देण्यात आले. नोव्हेंबरमध्येच त्याचे कार्यादेश जारी करण्यात आले. तीन महिन्यात अर्थात फेब्रुवारी २०१६ पर्यंत सदर कंत्राटदाराने बॅचमिक्स प्लॅन्ट उभारण्याची हमी निविदेत दिली होती. त्यापोटी दहा लाख रुपयांची अनामत रक्कमही (एफडीआर) निविदेसोबत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली होती. मात्र निर्धारित तीन महिन्यात शारदा कंस्ट्रक्शनचा प्लॅन्ट उभा राहिला नाही. अखेर बांधकाम खात्याने ती दहा लाखांची रक्कम जप्त केली. त्यानंतर नियमानुसार दुसऱ्या स्पर्धकाला हे काम देणे किंवा पुन्हा निविदा बोलविणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात तसे न करता उलट शारदा कंस्ट्रक्शनलाच दोन महिने अर्थात एप्रिलपर्यंत प्लॅन्ट उभारणीसाठी मुदत वाढवून देण्यात आली. यवतमाळ-अमरावती मार्गे गेलेल्या या प्रस्तावाला मुंबईत मंजुरी देण्यात आली. मात्र आता एप्रिल महिना अर्ध्यावर येऊनही प्लॅन्ट स्थापण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे या दहा किलोमीटरच्या रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सध्याच या मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठ्ठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे काम न झाल्यास या मार्गावरून धावणे वाहनांना कठीण होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नांदेडच्या कंत्राटदारांसाठी पांढरकवड्यात सॉफ्टकॉर्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पांढरकवडा येथील कार्यकारी अभियंता के.आर. पाटील हे नांदेडवरून बदलून आले आहेत. त्यामुळे नांदेडच्या कंत्राटदारांचा पांढरकवड्यात कामे घेण्यासाठी शिरकाव वाढला आहे. आधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी नसल्याने स्थानिक कंत्राटदारांना कामे मिळणे कठीण झाले आहे. त्यातच नांदेडवरून जाणीवपूर्वक कंत्राटदार आयात केले जात असल्याने स्थानिक कंत्राटदारांमध्ये नाराजीचा सूर पहायला मिळतो आहे. नांदेडच्या अनेक कंत्राटदारांनी निविदा भरल्या. त्यात ते पात्र ठरले नाही ही वेगळी बाब. नांदेडच्या कंत्राटदारांसाठी पांढरकवडा बांधकाम विभागात खास ‘सॉफ्टकॉर्नर’ ठेवला जात आहे. नांदेडच्या कंत्राटदाराला मिळालेले हे पहिलेच १८ कोटींचे काम वादग्रस्त ठरले आहे. हे काम वेळेत पूर्ण करून घेण्याचे आव्हान बांधकाम विभागापुढे आहे. निविदा मंजूर झाल्यापासून पाच महिन्यात वणी-पाटण मार्गाचे दरमहा एक कोटी प्रमाणे किमान पाच कोटी रुपयांचे काम होणे बंधनकारक होते. मात्र प्रत्यक्षात केवळ डब्ल्यूबीएमचे काम झाले आहे. त्यापोटी एक कोटी २० लाख रुपयांची रक्कम (७०-५० लाख) कंत्राटदाराला अदाही करण्यात आली. वास्तविक निविदेतील नियोजनानुसार काम न करणाऱ्या या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई अपेक्षित होती. परंतु पांढरकवडा सार्वजनिक बांधकाम विभागाने ‘नांदेड कनेक्शनपोटी’ या दंडात्मक कारवाईला बगल दिली.