शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

१७५ आॅटोरिक्षा जप्त

By admin | Updated: January 28, 2017 01:42 IST

प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या तीन दिवसांत खासगी आॅटोरिक्षांवर कारवाई करीत १७५ आॅटोरिक्षा जप्त करण्यात आल्या.

आरटीओची खासगी आॅटोंवर कारवाईनागपूर : प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) गेल्या तीन दिवसांत खासगी आॅटोरिक्षांवर कारवाई करीत १७५ आॅटोरिक्षा जप्त करण्यात आल्या. या कारवाईने अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई आणखी काही दिवस चालणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार यांचे म्हणणे आहे.ओला, उबेरसारख्या कॅब सुविधाने कमी वेळात शहरात चांगलाच जम बसविला आहे. थेट घरापासून सेवा मिळत असल्याने अनेक प्रवासी आॅटोकडून या कॅबसुविधेकडे वळले आहे. दुसरीकडे अवैध प्रवासी वाहतुकीमुळे आॅटोचालकांना प्रवासी मिळणे कठीण झाले आहे. याला घेऊन काही दिवसांपूर्वी आॅटोचालक संघटनांनी आंदोलन केले. याची दखल घेत मंगळवारपासून आरटीओने अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाईची मोहीम हाती घेतली. यात पहिल्या दिवशी १२५ तर दुसऱ्या दिवशी ५० खासगी आॅटोरिक्षांवर कारवाई करण्यात आली. ही सर्व वाहने खासगी असताना मोठ्या संख्येत प्रवासी वाहतूक करीत होते. यातील ज्या वाहनावर सलग तीन चालान झाले असल्यास ते वाहन नष्ट करण्याची प्रक्रियाही परिवहन विभागाकडून राबवण्यात येणार आहे. या कारवाईकरिता शहर वाहतूक विभागाचीही मदत आरटीओकडून घेण्यात आली होती. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, प्रादेशिक परिवहन अधिकारी शरद जिचकार, पोलीस उपायुक्त (वाहतूक) स्मार्तना पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांच्या मार्गदर्शनात संजय पेंढारकर, बच्छराव, पल्लेवार, संजीवनी चोपडे, बच्छाव, चोपडे, केदार, इरपाते, तोमस्कर यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)