शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

१७१ कोटींच्या वसुलीचे आव्हान!

By admin | Updated: January 19, 2016 04:08 IST

आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे प्रमुख स्रोत अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न

मालमत्ता विभाग वसुलीत मागे : उद्दिष्ट गाठण्यासाठी विभागाची धावपळनागपूर : आर्थिक अडचणीतून सावरण्यासाठी महापालिका प्रशासनाने उत्पन्नाचे प्रमुख स्रोत अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न चालविला आहे. मालमत्ता विभागाच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु २८६ कोटींच्या डिमांडपैकी १७ जानेवारीपर्यंत जेमतेम ११५ कोटींची वसुली झाली आहे. त्यामुळे ३१ मार्च २०१६ पर्यंत कर आकारणी व कर संकलन विभागापुढे १७१ कोटींच्या वसुलीचे आव्हान उभे ठाकले आहे. मालमत्ता करापासून २०१५-१६ या वर्षात २७० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले होते. परंतु कर आकारणी पद्धतीच्या घोळामुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. वसुलीसाठी झोननिहाय वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. परंतु दिलेले उद्दिष्ट गाठण्यात अपयश आले आहे. याला काही कारणे आहेत. शहरातील साडेपाच लाख मालमत्तांचे फेरमूल्यांकन झालेले नाही. एप्रिल २०१६ पासून नवीन कर आकारणीची सुरुवात न करता मध्येच या पद्धतीनुसार कर आकारणी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील काही मालमत्ताधारकांना जुन्या पद्धतीने तर काहींना नवीन पद्धतीने देयके पाठविण्यात आली आहेत. याचाही वसुलीवर परिणाम होणार आहे. मालमत्ता विभागातील रिक्त पदांचा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी खासगी कंपनीवर सोपविण्यात आली आहे. परंतु सर्वेक्षणाच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. मालमत्ता कर वसुलीचे झोननिहाय तसेच निरीक्षकांना कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. उद्दिष्टपूर्तीसाठी काही झोनकडून चांगला प्रतिसाद आहे. परंतु काही झोनमध्ये उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नाही. कर आकारणीचा गोंधळ सुरू असल्याने वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता नाही. एलबीटी रद्द करण्यात आल्याने महापालिका प्रशासनाने मालमत्ता कराच्या वसुलीवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतु तांत्रिक अडचणी व अभ्यासू कर्मचाऱ्यांची विभागात कमतरता असल्याने वसुलीवर परिणाम झाला आहे. (प्रतिनिधी)झोन डिमांड (कोटी) वसुली (कोटी) लक्ष्मीनगर ३९.०५ २२.११धरमपेठ ५९.३१ १७.००हनुमाननगर २८.०८ १३.६०धंतोली १५.५५ ८.३४नेहरूनगर २५.१३ ९.६१गांधीबाग १०.८३ ५.७०सतरंजीपुरा १३.४७ २.९८लकडगंज ३७.९७ १२.१२आशीनगर २६.२६ ०९.००मंगळवारी २९.७८ १५.२०एकूण २८६ ११५.६६