शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत सिग्नल तोडणारे १७ हजारावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 10:04 IST

नागपुरात जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १७ हजार ३६५ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडल्याची नोंद आहे. ही प्रवृत्ती वाढत असल्याचे वास्तव आहे.

ठळक मुद्देवाहतूक पोलीस विभागाची कारवाई नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण वाढतेय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चौकातील वाहतूक सिग्नलवर पोलीस असतील तरच नियम पाळले जात असल्याचे चित्र आहे. अनेकदा एका मार्गावर वाहतूक पोलीस उभा असल्यास वाहनचालक सिग्नल तोडत दुसऱ्या मार्गाचा वापर करतात. जानेवारी ते नोव्हेंबर महिन्यापर्यंत १७ हजार ३६५ चालकांनी वाहतूक सिग्नल तोडल्याची नोंद आहे. ही प्रवृत्ती वाढत असल्याचे वास्तव आहे.वाहनचालकांनी वाहतुकीच्या शिस्तीच्या नियमांचे पालन काटेकोरपणे करावे यासाठीच नियम मोडणाऱ्यांना दंड आणि शिक्षेची तरतूद आहे. परंतु सिग्नल तोडून पळून जाणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढते आहे. सिग्नल तोडल्यावर सापडल्यास अत्यंत किरकोळ दंड होतो. वाहनचालकांना त्याचे गांभीर्य वाटत नसल्यामुळे गेल्या अकरा महिन्यातील ‘सिग्नल जंपिंग’मध्ये १७ हजार ३६५ प्रकरणे समोर आली. यात साधारण ६० टक्के युवक असल्याची माहिती आहे. यातून शासनाच्या तिजोरीत लाखाच्यावर महसूल जमा झाला आहे.

सीसीटीव्हीचा प्रभाव नाहीशहरातील बहुसंख्य चौकात सीसीटीव्ही आहे. परंतु दुचाकी चालकांना त्यांची पर्वा नसल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, दर सेंकदाला वाहतूक सिग्नल तोडले जात असताना सर्वांनाच नोटीस मिळते असे नाही, यामुळे सीसीटीव्ही असूनची त्याचा प्रभाव पडत नसल्याचे चित्र आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा