शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

१७ घरफोडी करणारे आरोपी अटकेत

By admin | Updated: June 18, 2016 02:33 IST

हुडकेश्वर आणि अजनी परिसरात तब्बल १७ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

हुडकेश्वर पोलिसांची कामगिरी : २८ लाखांचा माल जप्तनागपूर : हुडकेश्वर आणि अजनी परिसरात तब्बल १७ ठिकाणी घरफोडी करणाऱ्या तीन आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्याजवळून चोरी केलेला २८ लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. पवन सुभाष रेहमतकर (२१) रा. नरसाळा राधारमन कॉलनी, अंकुश विलासराव मुळे (२०) रा. मु.पो. घाटलाडकी ता. चांदूरबाजार जि. अमरावती ह.मु. नरसाळा, राधारमन कॉलनी, आणि स्वप्नील दत्तात्रय आजने (२०) रा. उल्हासनगर मानेवाडा रोड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी तब्बल १७ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. यापैकी १६ घरफोडी ही हुडकेश्वर पोलीस ठाणे हद्दीत केली असून १ घरफोडी अजनी पोलीस ठाणे हद्दीत केली आहे. त्यांच्याजवळून अंदाजे किमत १३ लाख ८७ लाख ५०० रुपयाचे ५०२.५ ग्रॅम सोन्याचे दागिने, १४३० ग्रॅम (५७,२०० रुपये) चांदीचे दागिने, ३ दुचाकी वाहने (१ लाख ३० हजार रुपये), १ स्विफ्ट गाडी (४ लाख ५० हजार रुपये), १९ मोबाईल फोन व इतर सामान (४,६७,३१२ रुपये) आणि ३ लाख ७० हजार रुपये रोख असे एकूण २८ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती देताना हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.के. झावरे यांनी सांगितले की, पवन हा या टोळाचा मुख्य सूत्रधार आहे. या तिघांनीही शिक्षण सोडले आहे. अंकुश हा अमरावतीवरून शिक्षणासाठी नागपुरात आला होता. तो पवनच्या घरासमोरच भाड्याच्या खोलीत राहत होता. तेथेच दोघांची ओळख झाली. यातून दोघांनी चोरीची योजना आखली. सुरुवातीला दोघेही बाईकने फिरून घरफोडी करायचे. परंतु सापडले जाण्याची भीती लक्षात घेऊन ते आॅटोने फिरू लागले. दोघेही कॉलेज बॅग घेऊन आॅटोने फिरायचे. कुलूप लागलेल्या घरांवर पाळत ठेवायचे. रात्री १२ पर्यंत ज्या घरी कुलप लागलेले असायचे, त्या घराचे कुलूप तोडून चोरी करायचे. घरफोडी करण्याचे साहित्य त्यांच्या बॅगेतच राहत असे. तसेच चोरीचे साहित्य ते बॅगेत टाकून न्यायचे. त्यामुळे त्यांच्यावर कुणाला शंका येत नव्हती. तसेच या आरोपींचे कुठलेही गुन्हेगारी रेकॉर्डसुद्धा नव्हते. नवीन आरोपी असल्याने त्यांचा शोध घेणे एक आव्हान होते. परंतु हे आव्हान हुडकेश्वर पोलिसांनी स्वीकारले. (प्रतिनिधी)असे सापडले आरोपी चार महिन्यांपासून या आरोपींचा शोध सुरू होता. आरोपींनी अनेक ठिकाणांहून मोबाईल व एटीएम कार्ड चोरले होते. यापैकी काही कार्डवर एटीएमचा कोडनंबरही लिहून असल्याने त्यांना पैसे काढण्यास सोपे गेले. पोलीस ज्या ठिकाणी चोऱ्या झाल्या तेथील प्रत्येक ठिकाणांवर पाळत ठेवून होते. हनुमाननगर येथील एका एटीएममधून एक मुलगा सातत्याने पैसे काढत असल्याचे दिसून आले. तो पवन होता. त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली. त्याच्या मोबाईल सर्व्हिलन्सची तपासणी केली असता त्याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेतले तेव्हा घरफोडी करणारी ही टोळी उघडकीस आली. चोरीच्या पैशातून महाराष्ट्र दर्शन पवन आणि अंकुश हे चोरी करायचे तर स्वप्नील हा चोरलेले दागिने विकायचा. चोरलेल्या सोन्याच्या दागिन्याच्या मोबदल्यात त्यांनी एक स्विफ्ट गाडी घेतली होती. या गाडीने ते गोवा, शेगाव, गणपतीपुळे आदीसह महाराष्ट्र दर्शन करून आले. अटक होण्याच्या एक दिवसापूर्वीच ते फिरून आले होते. ओएलएक्सवर विकले चोरीचे मोबाईल आरोपींनी अनेक ठिकाणांवरून मोबाईल, कॅमेरे आदीसह अनेक वस्तू चोरल्या. या वस्तू त्यांनी ओएलएक्सवर आॅनलाईन विकल्याची बाबही उघडकीस आली. पोलीस आयुक्त करणार सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.के. झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक के.व्ही. चौगले, पोलीस हवालदार संदीप गुंडलवार, गुरुदेव कुंभलकर, पोलीस शिपाई नितीन आकोते, सूरज भोंगाडे, पंकज तांबडे, विलास चिंचुलकर, सचिन तुमसरे यांनी ही कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. शनिवारी होणाऱ्या क्राईम मिटिंगमध्ये पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांच्या हस्ते या सर्वांचा सत्कार करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त इशू सिंधू यांनी सांगितले.