शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१६७५ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त

By admin | Updated: October 16, 2015 03:18 IST

नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, रामटेक, हिंगणा आणि कळमेश्वर या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील ...

२ कोटी ७७ लाख रुपयांचे सावकारी कर्ज माफनागपूर : नागपूर जिल्ह्यातील उमरेड, काटोल, रामटेक, हिंगणा आणि कळमेश्वर या पाच तालुक्यातील शेतकऱ्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले ५२९ शेतकऱ्यांचे ७५ लाख ७८ हजार ४७४ रुपये इतके कर्ज गुरुवारी पार पडलेल्या बैठकीत माफ करण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत नागपूर जिल्ह्यातील एकूण १६७५ शेतकऱ्यांना सावकारी कर्जातून मुक्तता मिळाली आहे. आतापर्यंत एकूण १७५ सावकारांकडून घेतलेले २ कोटी ७७ लाख २५ हजार ५९२ रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या बैठकीस जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रतिनिधी रतनसिंह यादव, उपनिबंधक सतीश भोसले, जिल्हा विशेष लेखापरीक्षक प्रतिनिधी डी एस. पारसे, सहायक निबंधक टी.एन. चव्हाण, अशोक गिरी, सुखदेव कोल्हे, प्रकाश भजनी, अंजुषा गराटे उपस्थित होते. गुरुवारच्या बैठकीत उमरेड तालुक्यातील २६७ शेतकऱ्यांचे ४५ लाख ३४ हजार ७९७ रुपये, काटोल येथील २१४ शेतकऱ्यांचे २३ लाख २४ हजार ८८३ रुपये, रामटेक येथील २३ शेतकऱ्यांचे ४ लाख १९ हजार ९०७ रुपये, हिंगणा येथील ४ शेतकऱ्यांचे २९,५३२ रुपये, कळमेश्वर तालुक्यातील २१ शेतकऱ्यांचे २ लाख ६९ हजार ३५५ रुपये असे एकूण ५२९ शेतकऱ्यांनी घेतलेले ७५ लाख ७८ हजार ४७४ रुपये कर्ज माफ करण्यात आले. जिल्ह्यातील पात्र शेतकरी कर्जदारांची प्रकरणे तालुकास्तरीय समितीने अद्यापपर्यंत निकाली काढली नाहीत. ती प्रकरणे येत्या २८ आॅक्टोबरपर्यंत दाखल करण्याची सूचना जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी बैठकीत केली. परवानाधारक सावकारांनी त्यांच्या स्तरावरील पात्र कर्जदार शेतकऱ्याचे कर्ज मंजुरीचे प्रस्ताव तालुका सहायक निबंधक यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले. (प्रतिनिधी)