शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नागपुरात १६ संशयित दाखल : अमेरिका प्रवासावरून आलेल्या एका कुटुंबाचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 23:01 IST

कोरोना संसर्ग रोखण्यास काही प्रमाणात प्रशासनाला यश येत असल्याचे चित्र आहे. सलग तिसऱ्या दिवशी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. तर मंगळवारी फक्त १६ रुग्ण मेयो, मेडिकलमध्ये दाखल झाले.

ठळक मुद्देकोरोना संशयित रुग्णांच्या संख्येतही घट

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्ग रोखण्यास काही प्रमाणात प्रशासनाला यश येत असल्याचे चित्र आहे. सलग तिसऱ्या दिवशी एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही. तर मंगळवारी फक्त १६ रुग्ण मेयो, मेडिकलमध्ये दाखल झाले. पुढील १४ दिवस लोकांनी घरीच राहिल्यास व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास या कोरोनावर विजय मिळविणे शक्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.नागपुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. त्यानंतर १३ मार्च रोजी या रुग्णाच्या पत्नीची नोंद झाली. याच दिवशी अमेरिका प्रवासाची पार्श्वभूमी असलेला एक तर १४ मार्च रोजी त्याच्या संपर्कात आलेला आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला. यातील एका रुग्णावर मेयोमध्ये तर तीन रुग्णांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या स्थिर झाल्याने संशयित रुग्णांची संख्याही कमी होताना दिसून येत आहे. मेडिकलमध्ये दिवसभरात आठ संशयित रुग्ण दाखल झाले. यात दोन पुरुष, चार महिला व दोन लहान मुले आहेत. विशेष म्हणजे, अमेरिका प्रवासाचा पूर्वेतिहास असलेल्या एकाच घरातील तिघे आहेत. यात एक वर्षाचा मुलगा व सहा वर्षाची मुलगी आहे. याशिवाय फ्रान्समधून प्रवास करून आलेली २३ वर्षीय महिला आहे. या सर्वांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, रात्री उशिरा अहवाल येण्याची शक्यता आहे. तर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) मंगळवारी आठ संशयित रुग्ण भरती झाले. यातील सहा संशयितांचा परदेशी प्रवासाचा तर दोघांचा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्काचा इतिहास आहे.दुपारपर्यंत सहा नमुने निगेटिव्हमेयोच्या प्रयोगशाळेत आज पहिल्या टप्प्यात मेयोतील पाच तर अकोल्यातून आलेल्या एक असे सहा संशयित रुग्णांचे नमुने तपासण्यात आले. हे सर्वच नमुने निगेटिव्ह आले. यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले. दुपारनंतर मेयोतील दोन तर मेडिकलमधील आठ संशयित रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीला सुरुवात झाली. त्यांचा अहवाल रात्री उशिरा येण्याची शक्यता आहे.आतापर्यंत संशयितांची संख्या १३१आतापर्यंत नागपुरात १३१ कोरोना विषाणू संशयितांची नोंद झाली असून यातील ९६ रुग्णांना भरती करण्यात आले. पॉझिटिव्ह आलेल्या चार रुग्ण वगळता इतर सर्वांचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. या सर्व रुग्णांचा आरोग्य विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे.विमानतळावर २२ प्रवाशांची तपासणीडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोहा आणि शारजा येथून येणाºया १००४ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यात मंगळवारी तपासण्यात आलेल्या २२ प्रवाशांचा समावेश आहे. यातील सात प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. पुढील १४ दिवसांपर्यंत त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेवली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल