शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

१५२ कोटींच्या घोटाळ्याची पुन्हा चौकशी

By admin | Updated: April 16, 2017 01:50 IST

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५२ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार आहे.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक : तीन महिन्यात चौकशी अहवाल येणारनागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील १५२ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याची पुन्हा चौकशी होणार आहे. बँकिंग व विधितज्ज्ञ अ‍ॅड. डॉ. सुरेंद्र खरबडे यांची शासनाने १२ एप्रिलला नव्याने चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पुढील आठवड्यात आर्थिक घोटाळ्याची चौकशी सुरू होणार असून अहवाल तीन महिन्यात शासनाला सादर करण्यात येणार आहे. प्राप्त माहितीनुसार, जिल्हा बँकेतील १५२ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याच्या चौकशीसाठी शासनाने अ‍ॅड. खरबडे यांची जून २०१४ मध्ये चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. त्यावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले होते. त्यानुसार खरबडे यांनी चौकशी सुरू केली. त्यांना सहा महिन्यात शासनाला अहवाल सादर करायचा होता. शासनाच्या आदेशाला सुनील केदार यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने त्यांच्या दोन्ही याचिका फेटाळून लावताना नियुक्ती योग्य असल्याचा निर्वाळा दिला होता. त्यानंतर सुनील केदार यांनी चौकशीत डीडीआर आणि नाबार्डला सहभागी करण्यासाठी अर्ज दिला होता. केदार यांच्या वेळकाढू धोरणामुळे खरबडे यांनी डीडीआर आणि नाबार्डला प्रतिवादी न करता त्यांच्यावर १० हजारांचा दंड ठोठावला होता. खरबडे यांच्या आदेशाविरुद्ध केदार यांनी उच्च न्यायालयात पुन्हा याचिका दाखल केली. याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने त्यांना ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला. या आदेशाविरुद्ध केदार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी ३ आॅगस्ट २०१५ ला स्थगनादेश दिला. तेव्हापासून आर्थिक घोटाळ्याची चौकशी बंद होती. खरबडे यांचा चौकशी अधिकारी म्हणून कार्यकाळ जानेवारी २०१६ ला संपला. त्यांनी चौकशीतून मुक्त करण्याचा अर्ज उच्च न्यायालयात दाखल केला. न्यायाधीशांनी त्यांना २ मार्च २०१७ रोजी कार्यमुक्त केले. शासनाने घोटाळ्याची चौकशी व्हावी, या हेतूने ‘सर्क्युलेशन’ मागविले. त्यानंतर ६ एप्रिल २०१७ ला सर्वोच्च न्यायालयात केस बोर्डावर लागली आणि सुनावणी झाली. केदार यांची विशेष अनुमती याचिका फेटाळून लावताना खरबडे यांचा डीडीआर आणि नाबार्डला प्रतिवादी न करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ग्राह्य धरला. त्यानुसार शासन चौकशीसाठी पुन्हा मोकळे झाले. शासनाने १२ एप्रिल २०१७ ला पुन्हा अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्तीचा आदेश काढला. पण खरबडे बाहेरगावी असल्यामुळे त्यांना शासनाचा आदेश १५ एप्रिलला मिळाला. खरबडे यांनी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अटीवर शासनाचा आदेश स्वीकारला. अ‍ॅड. सुरेंद्र खरबडे पुढील आठवड्यापासून नागपूर जिल्हा बँकेतील १५२ कोटींच्या आर्थिक घोटाळ्याची नव्याने चौकशी करणार आहे. दरदिवशी चौकशी करून ते तीन महिन्यात शासनाला चौकशी अहवाल सादर करणार आहेत.(प्रतिनिधी)