शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

१५०० वर्षे प्राचीन बुद्ध मूर्ती विदर्भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 00:58 IST

रामटेकपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन म्हणजे पूर्वीचे नंदीवर्धन येथील हमलापूरी गावात १९८२ मध्ये कालव्याच्या खोदकामात तथागत गौतम बुद्ध यांच्या कांस्य धातूच्या तीन मूर्ती गवसल्या. विदर्भातील सर्वात प्राचीन मूर्तींपैकी या तीन मूर्ती आहेत. गुप्त-वाकाटक काळातील साधारण १५०० किंवा १६०० वर्षे एवढ्या जुन्या मूर्ती असाव्यात. मध्यवर्ती संग्रहालायत यातील सध्या दोन मूर्ती प्रदर्शित असून लवकरच तिसरी मूर्ती ठेवली जाणार आहे.

ठळक मुद्देनगरधनमध्ये मिळाल्या होत्या तीन बुद्ध मूर्ती

सुमेध वाघमारे /लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रामटेकपासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या नगरधन म्हणजे पूर्वीचे नंदीवर्धन येथील हमलापूरी गावात १९८२ मध्ये कालव्याच्या खोदकामात तथागत गौतम बुद्ध यांच्या कांस्य धातूच्या तीन मूर्ती गवसल्या. विदर्भातील सर्वात प्राचीन मूर्तींपैकी या तीन मूर्ती आहेत. गुप्त-वाकाटक काळातील साधारण १५०० किंवा १६०० वर्षे एवढ्या जुन्या मूर्ती असाव्यात. मध्यवर्ती संग्रहालायत यातील सध्या दोन मूर्ती प्रदर्शित असून लवकरच तिसरी मूर्ती ठेवली जाणार आहे.मध्यवर्ती संग्रहालय हे मध्य भारतातील आकर्षणाचे केंद्र आहे. ७ मे १८६३ रोजी सुरू झालेले या संग्रहालयाने आपली १५० वर्षे नुकतीच पूर्ण केली आहेत. संग्रहालयातील अनेक दुर्मिळ तसेच ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वस्तू विशेषत: ब्रिटिश काळामध्ये संकलित करण्यात आल्या आहेत. ब्रिटिश काळात जी काही संग्रहालये निर्माण करण्यात आली त्यापैकी नागपूर येथील मध्यवर्ती संग्रहालय हे भारतातील सर्वात जुने व अग्रणी संग्रहालय आहे. या संग्रहालयाचे अभिरक्षक डॉ. विराग सोनटक्के म्हणाले, भारतात प्राचीन मूर्ती या हडप्पा संस्कृतीमध्ये मिळतात. तथागत गौतम बुद्ध यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ३०० वर्षांनी सम्राट अशोकानंतर कुशान काळात दगडाच्या मूर्ती तयार करण्यास सुरूवात झाली. याची सुरूवात बुद्धांच्या मूर्तीपासून झाली. तिसऱ्या शतकामध्ये कांस्य धातूपासून मूर्ती बनविणे सुरू झाले. दगडाची मूर्ती जड व रहदारीस कठीण असल्याने धातूच्या मूर्तींची देवाणघेवाण वाढली. त्यावेळी तांबे, पितळ व टिनाचा धातूचा वापर करून मूर्ती तयार करीत असत. मूर्ती तयार करण्यासाठी साचा वापरला जायचा.गुप्त-वाकाटक काळातील मूर्तीया मूर्ती विदर्भातील नाही, यावर बोलताना डॉ. सोनटक्के म्हणाले, विदर्भात तांब्याचा ‘सोर्स’ नाही, दुसरे म्हत्त्वाचे म्हणजे, बुद्धाने परिधान केलेले वस्त्र, मूर्तीची कलात्मकता व अलंकार याचे सूक्ष्म अभ्यास केल्यानंतर त्या उत्तर भारतातील असल्याचे समोर आले. उत्तर भारतात त्यावेळी गुप्त लोकांचे राज्य होते. तेथील दगडाचा मूर्ती व मिळालेल्या बुद्धांच्या कांस्य मूर्तीत साम्य आढळून आले आहे. अभ्यासातून असेही पुढे आले आहे की, उत्तरेतील गुप्त व नगरधनमधील वाकाटकांमध्ये कौटुंबिक संबंध निर्माण झाले होते. धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी आले असताना बौद्ध भिक्खूंनी या मूर्ती येथे आणल्या असाव्यात असा अंदाज आहे. म्हणून गुप्त-वाकाटक काळातील मूर्ती म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.रामटेकपासून सात किलोमीटर अंतरावर नगरधन पूर्वीचे नंदीवर्धन येथे हमलापुरी गाव आहे. १९८२ मध्ये दामले यांच्या शेतीसाठी कालव्याच्या खोदकामात कांस्याच्या तीन बुद्धमूर्ती, प्रभामंडल व इतर साहित्य अचानक सापडले. या सर्व बुद्धमूर्ती साधारण वेगवेगळ्या उंचीच्या आहेत. या मूर्तीचे संग्रहालयाच्यावतीने अभ्यास केला असता विदर्भातील सर्वात प्राचीन मूर्तींपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाण धोरणांतर्गत धातू माध्यमात तीन पैकी एक बुध्दमूर्ती फ्रान्समध्ये अस्थायी प्रदर्शनासाठी पाठविण्यात आली होती, असेही डॉ. सोनटक्के यांनी सांगितले.तिसरी बुद्धमूर्ती लवकरच प्रदर्शितमध्यवर्ती संग्रहालय संशोधक व अभ्यासकांसाठी शैक्षणिक केंद्र ठरले आहे. विदर्भात प्राप्त झालेल्या गुप्त-वाकाटक काळातील तीन बुद्ध मूर्तीपैकी सुरुवातील एक मूर्ती प्रदर्शित करण्यात आली होती. आता दोन मूर्ती आहेत, लवकरच तिसरी मूर्ती प्रदर्शित केली जाणार आहे.डॉ. विराग सोनटक्केअभिरक्षक, मध्यवर्ती संग्रहालय

टॅग्स :Buddha Purnimaबुद्ध पौर्णिमाNagpur Central Museumनागपूर मध्यवर्ती संग्रहालय