शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूरच्या १५ वर्षीय ‘जलकन्ये’चा अरबी समुद्रात विक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 09:51 IST

नागपुरातील हिमानीने मुंबईतील ‘संक रॉक ते गेट वे आॅफ इंडिया’ हे पाच किमी अंतर ४२ मिनिटे ५४ सेकंदात पूर्ण करून राज्यात अव्वल क्रमांक पटकविला.

ठळक मुद्देसागरी जलतरण हिमानी फडके ठरली सर्वात वेगवान जलतरणपटू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सागरी किनारा नसलेल्या नागपुरात जलतरणपटूंची मोठी फळी निर्माण झाली. पोहण्याच्या पुरेशा सुविधा नाहीत; जलतरण तलावांची स्थिती बिकट आणि आर्थिक पाठबळ नसताना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर झेप घेणारे जलतरणपटू येथेच घडले. सागरी जलतरणातही मुसंडी मारणारे स्थानिक खेळाडू मोठा नावलौकिक मिळवीत आहेत. १५ वर्षांची हिमानी फडके हिची या खेळातील घोडदौड इतरांना प्रेरणास्पद ठरावी.हिमानीने मुंबईतील ‘संक रॉक ते गेट वे आॅफ इंडिया’ हे पाच किमी अंतर ४२ मिनिटे ५४ सेकंदात पूर्ण करून राज्यात अव्वल क्रमांक पटकविला. सर्वात वेगवान जलतरणपटू असा मान मिळविणाऱ्या हिमानीने सलग आठव्यांदा अव्वल स्थान कायम राखले हे विशेष. राज्यातील अन्य कोणत्याही जलतरणपटूला हिमानीची बरोबरी करता आलेली नाही.वयाच्या नवव्या वर्षांपासून शार्क अ‍ॅक्वेटिक असोसिएशनमध्ये संजय बाटवे यांच्या मार्गदर्शनात सराव करणारी हिमानी १५ व्या वर्षी राष्ट्रीय शालेय जलतरणात सलग तीनवेळा सुवर्ण विजेती ठरली. नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतील जलतरणात १७ वर्षे गटात तिने कांस्य पदक जिंकले. वडील खासगी काम करून हिमानीला प्रोत्साहन देत आहेत. उमरेड रोडवरील संजुबा स्कूलमध्ये नवव्या वर्गात शिकणाऱ्या या मुलीला थकवा काय असतो हे माहिती नाही. तिचे पोहणे अव्याहतपणे सुरू असते. मुंबईत सहकारी जलतरणपटंनी हिमानीकडून प्रेरणा घेत पुरस्कार जिंकले. त्यात नकूल भोयर हा पाच किमी स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर आला. हिमांशु खुजे, सोहनी मुखर्जी, शांतनु ठाकरे यांनीही चांगली कामगिरी केली तर दिव्यांग जलतरणपटू रोहित बोवाडे दोन किमी स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला.हिमानीची जलतरणातील कामगिरीशालेय क्रीडा स्पर्धेत कोलकाता, राजकोट आणि दिल्लीतील स्पर्धेत विक्रमी पदकांची कमाईखेलो इंडिया स्पर्धेच्या जलतरणात १७ वर्षे गटात कांस्य पदकसिंधूदुर्ग येथील सागरी जलतरणात सलग सहावेळा अव्वल स्थानमुंबईतील सागरी जलतरणात विक्रमी वेळेसह सलग दुसऱ्यांदा अव्वल स्थानहिमानीचे भविष्य उज्ज्वल आहे. तिची एकाग्रता चांगली असून तिच्यात अथकपणे पोहण्याची जिद्द आहे. पुढील चार वर्षांत ती देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसेल. उद्या, २४ फेब्रुवारी रोजी गोव्यात होणाऱ्या दहा किमी सागरी जलतरणात ती पहिल्या तीनमध्ये राहील,असा विश्वास आहे.

- संजय बाटवे, कोच

टॅग्स :Sportsक्रीडा