शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात १५ सायबर लॅब

By admin | Updated: August 9, 2016 02:46 IST

कॉम्प्युटर, मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या (आॅनलाईन) गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त

आॅनलाईन गुन्ह्यांचा तातडीने छडा : स्वातंत्र्य दिनी उद्घाटन नरेश डोंगरे ल्ल नागपूर कॉम्प्युटर, मोबाईलच्या माध्यमातून होणाऱ्या (आॅनलाईन) गुन्ह्यांचा तातडीने छडा लावण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या सायबर लॅब निर्मितीची प्रक्रिया राज्यात वेगात सुरू आहे. यापैकी नागपूरसह ठिकठिकाणच्या १५ सायबर लॅबचे काम अंतिम टप्प्यात असून, स्वातंत्र्य दिनी, १५ आॅगस्टला त्या कार्यान्वित होणार आहेत. या लॅबमुळे तपासाचे धागेदोरे जोडण्यासाठी पोलिसांना ‘फॉरेन्सिक लॅब’ वर महिनोंमहिने अवलंबून राहावे लागणार नाही. अलीकडे आॅनलाईन गुन्हेगारीचा आलेख सारखा वाढतो आहे. विशेषत: मोठमोठे घोटाळे करणारी मंडळी संगणक आणि मोबाईलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये इकडे तिकडे करताना पकडले जाऊ नये यासाठी नवनवीन क्लृप्त्या शोधतात. आर्थिक घोटाळ्यांसोबतच डब्बा ट्रेडिंगसारखी कोट्यवधींची सट्टेबाजी, क्रिकेट बेटींग, लॉटरी लागल्याच्या नावाखाली केली जाणारी फसवणूक, दिशाभूल करणारी माहिती देऊन परस्पर बँक खात्यातून रक्कम काढून घेण्याचे गैरप्रकार बिनबोभाट सुरू आहेत. उपकरणे आणि प्रशिक्षणही ! ४केवळ प्रशस्त कक्षच नव्हे तर अत्याधुनिक उपकरणेही ‘सायबर लॅब’मध्ये जोडण्यात आली असून, मोबाईल फॉरेन्सिक सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर, हार्डडिस्क फॉरेन्सिक सॉफ्टवेअर डिवाईसचा त्यात समावेश राहणार आहे. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी या प्रणालीचा उपयोग कसा करावा, त्याचे सिडॅकमार्फत प्रशिक्षणही दिले जाणार आहे. सध्या चंद्रपुरात हे प्रशिक्षण दिले जात असून, त्यानंतर नागपुरातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सिडॅकतर्फे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे आता सायबर लॅबमध्येच संगणक, मोबाईलमध्ये दडवून ठेवलेल्या साहित्याची बसून कॉपी, ईमेजेस बनविणे शक्य होईल. पासवर्डही क्रॅक करता (शोधता) येईल.