शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

सरकारी रोख्यांमध्ये २.७० कोटींचा घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 11:58 IST

नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा नियमबाह्य व्यवहार झाल्याचे लेखापरीक्षकाने अंकेक्षण अहवालात नमूद केले आहे. हा आर्थिक घोटाळा २.७० कोटींचा आहे.

ठळक मुद्दे अध्यक्ष अशोक धवड यांच्यावर अंकेक्षण अहवालात ताशेरे

मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नवोदय बँकेने खरेदी केलेल्या सरकारी रोख्यंची (गव्हर्नमेंट सिक्युरिटीज) रक्कम मॅच्युअर झाल्यानंतर आपल्या खात्यात वळती न करता पंजाब नॅशनल बँकेत नव्याने खाते उघडून जमा केली आणि ही रक्कम हेमंत झाम यांच्या खात्यात बँकेने धनादेश देऊन वळती केली. हा सर्व व्यवहार रिझर्व्ह बँकेने नवोदय बँकेवर ३५(ए)ची कारवाई केल्यानंतर करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष अशोक धवड आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा नियमबाह्य व्यवहार झाल्याचे लेखापरीक्षकाने अंकेक्षण अहवालात नमूद केले आहे. हा आर्थिक घोटाळा २.७० कोटींचा आहे. ही रक्कम हेमंत झाम यांच्याकडून व्याजासहित एकमुस्त वसुल करावी, असे अहवालात निर्देशित केले आहे.नवोदय बँकेचे एचडीएफसी बँकेत एसजीएल खाते आहे. बँकेने सन २०१२ अणि २०१३ मध्ये तीन तारखांना गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये २.२५ कोटी गुंतविले. बँकेला या सिक्युरिटीजवर १६ आॅक्टोबर २०१६ ते १५ एप्रिल २०१७ पर्यंत एकूण ८,४२,५२५ रुपये व्याज मिळाले. त्यामुळे गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची रक्कम २ कोटी ३३ लाख ४२ हजार ६२५ रुपये झाली. शिवाय या गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये बँकेची ३८ लाख ७२ हजार ५७८ एवढी रक्कम शिल्लक होती. मॅच्युरिटीची रक्कम आणि शिल्लक रक्कम असे एकूण २.७२ कोटी रुपये बँकेच्या एसजीएल खात्यात जमा झाले होते.ही रक्कम नवोदय बँकेच्या खात्यात वळती न करता अध्यक्ष अशोक धवड यांनी ९ जुलै २०१७ रोजी विशेष सभा बोलावून पंजाब नॅशनल बँक, किंग्जवे नागपूर येथे चालू खाते उघडण्याबाबत ठराव घेतला. या खात्यावर व्यवहार करण्याचे आणि धनादेशावर सही करण्याचे अधिकार बँकेचे अध्यक्ष अशोक धवड, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नाईक आणि व्यवस्थापक अशोक पिंपळघरे यांच्यापैकी कोणत्याही दोन सहीने राहतील, असे ठरविण्यात आले.गव्हर्नमेंट सिक्युरिटीजची रक्कम एसजीएल खात्यात जमा झाल्यानंतर या खात्यातून २३ मे २०१७ रोजी आरटीजीएसने २.७१ कोटी रुपये विड्रॉल करून नव्याने उघडलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात जमा करण्यात आले. ही रक्कम बँकेत जमा झाल्यानंतर बँकेचे अध्यक्ष अशोक धवड व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नाईक यांनी ठेवीदार हेमंत झाम यांच्याशी आपसी संगनमत करून त्यांना चेक क्र. ३६५८७७ ने २.७० कोटी एवढी रक्कम दिली.चेक क्लीअर झाल्यानंतर हेमंत झाम यांनी ३५(ए)नुसार आर्थिक निर्बंध लागल्यानंतरही २.७० कोटींची उचल केली.भारतीय रिझर्व्ह बँकेने कलम ३५ (ए)अन्वये नवोदय बँकेवर १५ डिसेंबर २०१६ पासून आर्थिक निर्बंध लावलेले असतानाही बँकेचे ठेवीदार हेमंत झाम यांना २.७० कोटींची ठेव परत करून आर्थिक घोटाळा केला आहे. बँकेवर निर्बंध असल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारच्या ठेवी परत करता येत नाही. अटीमध्ये नमूद केल्यानुसार ठेवीदारांना केवळ एक हजार रुपयापर्यंतच्या ठेवी परत करण्याचा सूचना होत्या. त्यानंतरही नवोदय बँकेने हेमंत झाम यांना २.७० कोटींच्या ठेवी परत केल्या आहेत. यासंदर्भात संजय नाईक यांना खुलासा मागितला असता, त्यांनी तो दिला नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. आर्थिक निर्बंध असतानाही बँकेचे अध्यक्ष अशोक धवड, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नाईक आणि व्यवस्थापक अशोक पिंपळघरे यांनी आपल्या सहीने पंजाब नॅशनल बँकेत खाते उघडण्यास सहमती दर्शविल्याने या व्यवहारास अशोक धवड आणि अधिकारी हे संयुक्तरीत्या जबाबदार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :bankबँक