शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गरजू वकिलांसाठी १.४७ कोटीची तरतूद : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:05 IST

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील वकिलांसाठी बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा यांनी १ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून आतापर्यंत राज्यातील ३,६०० गरजू वकिलांना अन्नधान्याच्या किट वितरित करण्यात आल्या आहेत. हे मदतकार्य पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्दे३६०० वकिलांना अन्नधान्याच्या किट वितरित

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या राज्यातील वकिलांसाठी बार कौन्सिल ऑफ इंडिया व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवा यांनी १ कोटी ४७ लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यातून आतापर्यंत राज्यातील ३,६०० गरजू वकिलांना अन्नधान्याच्या किट वितरित करण्यात आल्या आहेत. हे मदतकार्य पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे.ही माहिती शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. यासंदर्भात खामगाव येथील अ‍ॅड. आरीफ शेख दाऊद यांची जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावरील सुनावणीदरम्यान बार कौन्सिलसह वकिलांच्या संघटनांनी आपापली भूमिका मांडली. बार कौन्सिल ऑफ इंडियाने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाला आवश्यक आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अ‍ॅण्ड गोवाने गरजू वकील त्यांच्यापर्यंत आल्यास आवश्यक पडताळणी करून त्यांना अन्नधान्याच्या किट दिल्या जातील असे सांगितले. हायकोर्ट बार असोसिएशनने गरजू वकिलांना ४००० रुपये देण्याची योजना सुरू केली आहे. त्या योजनेची माहिती न्यायालयाला देण्यात आली. याशिवाय डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन गरजू वकिलांना २००० रुपये देत आहे. आतापर्यंत २०० वर वकिलांना हे आर्थिक सहकार्य अदा केले गेले आहे, याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी ही सर्व माहिती रेकॉर्डवर घेऊन प्रकरणावर २२ जून रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. मीर नगमान अली यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :advocateवकिलcorona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालय