लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाच्या जवानांनी शनिवारी मास्क शिवाय फिरणाऱ्या बेजबाबदार १४७ नागरिकांविरुध्द कारवाई केली. त्यांच्याकडून ७३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी २५४०७ नागरिकांविरुध्द कारवाई करुन १ कोटी १० लाख ६२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी संसर्गाचा अद्यापही धोका टळलेला नाही. असे असूनही विनामास्क नागरिक फिरताना दिसतात ही बाब घातक आहे. अशा नागरिकांवर कारवाई केली जात आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे. शोध पथकाचे प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत १९९३७ नागरिकांकडून ९९ लाख ६८ हजार ५०० रुपये वसूल करण्यात आले आहे.