शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

लाेकमत ते व्हेरायटी चाैकात १४,४७९ झाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:07 IST

निशांत वानखेडे नागपूर : आपल्या अवतीभवतीच्या सिमेंटच्या इमारती पाहताना यामध्ये झाडे किती असतील, याचा विचारही तुम्ही केला नसेल. मात्र ...

निशांत वानखेडे

नागपूर : आपल्या अवतीभवतीच्या सिमेंटच्या इमारती पाहताना यामध्ये झाडे किती असतील, याचा विचारही तुम्ही केला नसेल. मात्र यानंतर कुणी प्रश्न केला तर त्याचे हमखास उत्तर तुम्हाला देता येईल. किमान लाॅ काॅलेज चाैक ते बजाजनगर ते लाेकमत चाैक, रामदासपेठ ते व्हेरायटी चाैक या भागात राहणारे नागरिक हा आकडा नक्की सांगू शकतील. हाेय, या ३ चाैरस किलाेमीटरच्या परिघात स्थानिक व परकीय अशा १९१ प्रजातीचे १४,४७९ झाडे आहेत.

लाेकल बाॅयाेडायव्हर्सिटी स्ट्रॅटेजी ॲन्ड ॲक्शन प्लॅनअंतर्गत भारतातील काही शहरांमध्ये सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर व ठाणे या शहराचा समावेश आहे. शहरी जैवविविधता टिकविण्यासाठी अशाप्रकारचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. या अभियानाचा भाग असलेल्या वनस्पतीतज्ज्ञ प्राची माहुरकर यांनी या उपक्रमाबाबत लाेकमतशी बाेलताना माहिती दिली. या टप्प्यात लाॅ काॅलेज ते लाेकमत चाैकापर्यंतच्या परिघात जून २०२० ते नाेव्हेंबर २०२० या सहा महिन्याच्या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यामध्ये कृषी विद्यापीठ तसेच महाराजबाग परिसराचाही समावेश आहे. अतिशय गांभीर्याने एकेका झाडाचे जिओटेकिंग करून रेकाॅर्ड नाेंदविण्यात आले आणि मृत झाडांचेही जिओग्रॅफिकल नाेटिफिकेशन घेण्यात आल्याचे प्राची यांनी सांगितले.

सुरुवातीला ८०-९० प्रजाती असतील असा अंदाज हाेता. पण पाहणी केली असता तब्बल १९१ प्रजाती आढळून आल्या. यामध्ये ११० स्थानिक तर ८१ विदेशी प्रजातींचा समावेश आहे. सेमिनरी हिल्स व अंबाझरी भागात सर्वेक्षण केल्यास ही संख्या ३०० च्या जवळपास जाण्याचा अंदाज प्राची यांनी व्यक्त केला. संपूर्ण शहरात ताे ४०० च्या घरात जाऊ शकताे.

नागपूर शहर अद्याप तरी पुणे, मुंबईप्रमाणे फुगलेले नाही. त्यामुळे संपूर्ण शहराच्या सर्वेक्षणाची संधी आहे. आम्ही त्याबाबत विनंती केली आहे. अशाप्रकारे प्राणी, पक्षी, फुलपाखरे, कीटक अशा घटकांचेही सर्वेक्षण हाेण्याची आवश्यकता आहे. त्यांचा बारकाईने अभ्यास केल्यास आपल्या शहरातील जैवविविधता सुदृढ करण्यासाठी कृती आराखडा तयार करणे व ताे राबविणे शक्य हाेईल.

- प्राची माहुरकर, वनस्पतीतज्ज्ञ