शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

राज्यात १४ लाखांपेक्षा अधिक वीज मीटर खराब; ४ % भरतात वापरापेक्षा जादा पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 10:33 IST

महावितरणच्या कारवाईनंतरही नोव्हेंबरमध्ये ६.९ टक्के ग्राहकांचे रिडिंग चुकीचे

कमल शर्मा

नागपूर : राज्यातील १४ लाख ८६ हजार ३११ ग्राहक असे आहेत ज्यांचे वीज मीटर फॉल्टी (खराब) आहेत. ६.९ टक्के रिडिंग सदोष आढळून आले आहेत. तसेच ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल पाठवले जात आहे. त्यांना वापरापेक्षा अधिक बिल भरावे लागत आहे. आर्थिक परिस्थिती बिघडल्याचा हवाला महावितरणतर्फे दिला जात असला तरी या प्रकारातून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे दिसून येते.

अचूक मीटर रिडिंगबाबत महावितरणने कठोर भूमिका घेतली. अनेक मीटर रिडिंग एजन्सींना निलंबित करण्यात आले.परंतु त्याचा परिणाम मात्र झाला नाही. नोव्हेंबर महिन्यातसुद्धा ६.९ टक्के रिडिंग चुकीचे आढळून आले. ऑक्टोबरमध्ये ही संख्या ७.२ टक्के होती. जून महिन्यातही इतकीच टक्केवारी होती. राज्यभरात ४ टक्के ग्राहकांना सरासरी बिल दिले जात आहे.

सरासरी मागील तीन महिन्यांच्या रिडिंगच्या आधारावर निश्चित केली जाते. तो काळ उन्हाळ्याचा होता. त्यामुळे स्वाभाविकपणे हिवाळ्यातही ग्राहकांना अधिक वापराचे बिल भरावे लागत आहे.

तपासाची कूर्मगती

हे मीटर चुकीचे रिडिंग दाखवतात. कंपनीला याची माहिती असूनही केवळ २.२ टक्के म्हणजे ३२,२६९ वीज मीटरचाच आढावा घेण्यात आला. तपासात केवळ २,८५९ मीटर व्यवस्थित आढळून आले.

मीटर बदलण्यास सुरुवात - महावितरण

महावितरणचे अधिकारी यासंदर्भात काहीही बोलायला तयार नाही. ते एकमेकांकडे बोट दाखवित आहेत; परंतु कंपनीतील सूत्रानुसार ही संख्या आश्चर्यकारक आहे. कंपनीकडे आता मीटरची टंचाईसुद्धा नाही. त्यामुळे फॉल्टी मीटर बदलण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. कंपनी सरासरी बिल बंद करण्याच्या प्रयत्नात असून, रिडिंगमधील चुकीबाबतही गंभीर आहे.

महावितरणचा अहवाल सांगतो...

  • ग्राहकांची संख्या - २,७२, ०३, ९८२
  • फॉल्टी मीटर - १६,२९,४११
  • खराब आढळले - १४,८६,३११

विभागानिहाय फॉल्टी मीटर 

  • कोकण - ५,१२,७१९
  • पुणे - २,६२,५७३
  • नागपूर - ३,२५,५८८
  • औरंगाबाद - ३,८५,४३१
टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज