शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत ‘एफटीटीआय’ला १३८ कोटींचे अनुदान

By admin | Updated: October 8, 2015 03:01 IST

‘एफटीआयआय’च्या (फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया)अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन देशभर गाजले.

३४२ विद्यार्थ्यांचा प्रवेश : १२ कोटींचे मिळविले उत्पन्ननागपूर : ‘एफटीआयआय’च्या (फिल्म अ‍ॅन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया)अध्यक्षपदावरून गजेंद्र चौहान यांना हटवण्यासाठी विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन देशभर गाजले. परंतु आश्चर्याची बाब म्हणजे या संस्थेला केंद्र शासनातर्फे गेल्या पाच वर्षात १३८ कोटींहून अधिक अनुदान देण्यात आले आहे. याची आकडेमोड केली असता प्रत्येक नियमित विद्यार्थ्यामागे शासनाने ४० लाखांचे अनुदान दिले असल्याचे स्पष्ट होत आहे. माहितीच्या अधिकारात ही बाब समोर आली आहे.नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘एफटीटीआय’ला केंद्र शासनाकडून २०१० पासून मिळालेले अनुदान, त्याचा खर्च, विद्यार्थ्यांचे प्रवेश इत्यादींसंदर्भात माहितीच्या अधिकारांत विचारणा केली होती. यासंदर्भात प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २०१० ते ३० जुलै २०१५ या कालावधीत ‘एफटीटीआय’ला केंद्र शासनाकडून १३८ कोटी २२ लाख रुपयांचे अनुदान प्राप्त झाले. संस्थेला योजनेअंतर्गत ५१ कोटी ७३ लाख रुपये प्राप्त झाले तर बिगर योजनेअंतर्गत ८६ कोटी ४९ लाख मिळाले. या कालावधीत ‘एफटीटीआय’ने १२ कोटी ४४ लाखांचे उत्पन्न मिळविले. योजनेअंतर्गत मिळालेल्या निधीपैकी ५१ कोटी ६३ लाख रुपये खर्च झाले. तर बिगर योजनेअंतर्गत मिळालेला निधी व उत्पन्न यांच्यातून ९८.९३ कोटी रुपये खर्च झाले. (प्रतिनिधी)३४२ विद्यार्थ्यांचा प्रवेशपुण्यातील या संस्थेत २०१० पासून ३४२ विद्यार्थ्यांनी विविध नियमित अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला. यात एक वर्षाच्या अभ्यासक्रमापासून ते तीन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समावेश आहे. मिळालेल्या अनुदानासोबत तुलना केली असता शासनाने प्रति विद्याथी ४० लाख ४१ हजार ५२० रुपयांचे अनुदान दिले आहे. याशिवाय पाच वर्षांच्या कालावधीत ३६ ‘शॉर्टटर्म’ अभ्यासक्रम चालविण्यात आले व ४५४ विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला. दरम्यान, २०१२ साली चार विद्यार्थ्यांना नियमांचे पालन न केल्याबद्दल संस्थेतून काढून टाकण्यात आले होते.