विधान परिषद सदस्य -३
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील आमदारांना स्थानिक विकासासाठी १३ कोटी २५ लाख रुपयाचा विकास निधी राज्य सरकारकडून प्राप्त झाला आहे. मार्च २०२१ पर्यंत हा निधी खर्च करावयाचा आहे.
नागपूर जिल्ह्यात एकूण १५ आमदार आहेत. यात १२ विधानसभा सदस्य व ३ विधान परिषद सदस्य आहेत. विधानसभा सदस्यांमध्ये शहरातील कृष्णा खोपडे (पूर्व नागपूर), विकास ठाकरे (पश्चिम नागपूर), नितीन राऊत (उत्तर नागपूर), मोहन मते (दक्षिण नागपूर), विकास कुंभारे (मध्य नागपूर) , देवेंद्र फडणवीस (दक्षिण-पश्चिम) आणि ग्रामीणमधील सुनील केदार (सावनेर), अनिल देशमुख (काटोल), समीर मेघे (हिंगणा), राजू पारवे (उमरेड) टेकचंद सावरकर (कामठी), आशिष जयस्वाल (रामटेक) यांचा समावेश आहे. तर विधान परिषद सदस्यांमध्ये गिरीश व्यास, प्रवीण दटके आणि अभिजित वंजारी यांचा समावेश आहे. राज्या शासनातर्फे आमदारांना दोन कोटी रुपयांचा विकास निधी मिळत होता. तो वाढवून ३ कोटी रुपये करण्यात आला आहे. सध्या आमदाराला प्रत्येकी एक कोटी रुपये विकास विधी मिळालेला आहे. यामध्ये १२ विधानसभा सदस्यांना प्रत्येकी १ कोटी प्रमाणे १२ कोटी व गिरीश व्यास यांना एक कोटी असे १३ कोटी रुपये तर प्रवीण दटके यांना २५ लाख रुपये विकास निधी मिळाला आहे. अभिजित वंजारी यांचा विकास निधी अजून यायचा आहे.
बॉक्स
रस्ते विकास व पाणी नियोजनावर सर्वाधिक निधी
आमदारांना मिळणारा स्थानिक विकास निधी हा सर्वाधिक रस्ते विकास व पाणी नियोजनावर खर्च केला जातो. सध्या मिळालेल्या निधीच्या कामांचे प्रस्ताव प्रशासनाकडे प्राप्त झालेले आहेत. यामध्ये रस्ते विकास व पाण्याच्या नियोजनााचीच कामे मोठ्या प्रमाणावर आहेत. यानंतर गडर लाईन दुरुस्ती, सामाजिक भवन आदींचीही कामे आहेत.
कोट-
मार्चपर्यंत करायचा आहे खर्च
आमदारांचा स्थानिक विकास निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे हा निधी आला आहे. तो मार्च २०२१ पर्यंत खर्च करायचा आहे. आमदारांकडून यासंदर्भातील कामांचा प्रस्ताव प्राप्त झालेली आहे.
ज्ञानेश्वर खडतकर, सहा. जिल्हा नियोजन अधिकारी