उपराजधानीत अपघात वाढले : जास्त अपघात पूर्व वाहतूक शाखेतनागपूर : शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरिक्षत प्रवास करणे कठीण झाले आहे. १ जानेवारी २०११ ते ३१ आॅगस्ट २०१५ या वर्षांत ५ हजार ५२७ अपघात झाले असून यात १ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे. इतर शाखेच्या तुलनेत पूर्व वाहतूक शाखेंतर्गत सर्वाधिक, १२८८ अपघात झाले आहेत.माहिती अधिकार कार्यकर्ता अभय कोलारकर यांनी मागितलेल्या माहितीच्या अधिकारात मिळालेली ही आकडेवारी धक्कादायक आहे. (प्रतिनिधी)सर्वाधिक मृत्यू इंदोरा वाहतूक शाखेंतर्गत गेल्या साडेचार वर्षांत सर्वाधिक मृत्यू इंदोरा वाहतूक शाखेंतर्गत येत असलेल्या हद्दीत झाले. यात १ हजार १२७ अपघात झाले असून अपघाती मृत्यूची संख्या २९६ एवढी आहे. पूर्व वाहतूक शाखेंतर्गत १ हजार २८८ अपघात झाले असून २६६ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम वाहतूक शाखेंतर्गंत ९९१ अपघात झाले असून २४६ अपघाती मृत्यूची नोंद आहे. उत्तर वाहतूक शाखेंतर्गत ६१४ अपघात झाले असून १०७ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण वाहतूक शाखेंतर्गत ८०० अपघातात १४५ जण दगावले तर एमआयडीसी वाहतूक शाखेंतर्गत ७०७ अपघात झाले असून २०८ जणांचा मृत्यू झाला आहे.
साडेचार वर्षांत १२६८ जणांचा मृत्यू
By admin | Updated: October 11, 2015 02:59 IST