शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१२५ गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणार

By admin | Updated: September 29, 2014 01:00 IST

राजकीय पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटीने पोलिसांचीही चिंता वाढवली आहे. निवडणुकीच्या दरम्यान नेता आणि गुन्हेगारांच्या युतीद्वारा (संबंध) गडबड पसरवण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी

निवडणुकीसाठी पोलीसही सज्ज : नेते-गुन्हेगारांच्या संबंधांवर करडी नजर जगदीश जोशी - नागपूर राजकीय पक्षांमध्ये झालेल्या फाटाफुटीने पोलिसांचीही चिंता वाढवली आहे. निवडणुकीच्या दरम्यान नेता आणि गुन्हेगारांच्या युतीद्वारा (संबंध) गडबड पसरवण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी राजकारणाशी संबंधित लोकांसह १२५ गुन्हेगारांना पोलीस कोठडीत टाकून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. नागपुरातील १२ विधानसभेच्या जागेसाठी सर्वच उमेदवारांमध्ये स्पर्धा आहे. या संधीचा लाभ घेऊन सर्वच मोठ्या गुन्हेगारांनी राजकीय पक्षांशी जवळीक साधली आहे. त्यामुळे पोलिसांनीही अधिक कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. सूत्रानुसार पोलिसांनी नेत्यांशी संबंधित आणि निवडणुकीमध्ये सक्रिय असणाऱ्या गुन्हेगारांची यादी तयार केली आहे. दारू आणि पैसे वाटणे, दंगा घडविणे, मतदारांना प्रभावित करणाऱ्या लोकांचा या यादीत समावेश आहे. सात गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत तुरुंगात पाठविण्याची शहरा पोलिसांची योजना आहे. गेल्या आठवड्यात नंदनवन येथील जीतू जाधव याला तुरुंगात पाठवून याची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच २० गुन्हेगारांना तडीपार आणि १०० गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करून तुरुंगात पाठविण्यात येणार आहे. ग्रामीण पोलिसांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान आतापर्यंत ८५३ लोकांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई केली आहे. शेजारी राज्यांच्या सीमेवर नाकाबंदी करण्यात आली आहे.