राज्य सरकारकडून निधी उपलब्ध : विकास कामांना गती मिळणारनागपूर : बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना करीत असलेल्या महापालिकेला राज्य सरकारकडून १२० कोटींची मदत मिळाली आहे. यातील २० कोटी सुरेश भट सभागृहासाठी उपलब्ध क रण्यात आले आहे. मंगळवारी महाराष्ट्राचे अवर सचिव विवेक कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे महापालिकेला मोठे आर्थिक बळ मिळणार असून शहरातील विकास कामांना गती मिळणार आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नागपूरसह विदर्भाच्या विकासाला गती मिळाली आहे. शहर विकासासाठी निधीची कमतरता पडणार नाही. अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. सोबतच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शहर विकासाठी प्रयत्न करीत आहेत. अशी माहिती सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, स्थापत्य समितीचे सभापती सुनील अग्रवाल, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रमेश ंिसंगारे, नगरसेवक प्रकाश तोतवाणी आदी उपस्थित होते.राज्यातील महापालिकांना मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांसाठी राज्य सरकारकडून अनुदान देण्यात येते. त्यानुसार सर्व महापालिकांना २५३ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक १२० कोटींचा निधी नागपूर महापालिकेला उपलब्ध करण्यात आला आहे. सुरेश भट सभागृहासाठी राज्य सरकारकडे ३० कोटींची मागणी केली होती. याला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. यातील पहिल्या टप्प्यात २० कोटी उपलब्ध करण्यात आले आहे. सभागृहाच्या कामाला गती मिळेल.(प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील विकास कामांसाठी १२० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे. यामुळे शहरातील विकास कामांना गती मिळणार आहे. सुरेश भट सभागृहाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच मूलभूत सुविधांची कामे तातडीने मार्गी लागण्याला मदत होईल.प्रवीण दटके, महापौर
१२० कोटींमुळे मनपाला आर्थिक बळ
By admin | Updated: November 17, 2016 03:04 IST