शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील १२ कामगारांचे अपहरण

By admin | Updated: September 20, 2016 02:23 IST

एमआयडीसीतील निको कंपनीतील १२ कामगारांचे ४ आरोपींनी अपहरण केले. या कामगारांना मारहाण करून

जबरदस्तीने वाहनात कोंबले : रायपूरमध्ये नेऊन सोडले नागपूर : एमआयडीसीतील निको कंपनीतील १२ कामगारांचे ४ आरोपींनी अपहरण केले. या कामगारांना मारहाण करून रायपूर(छत्तीसगड)ला सोडून देण्यात आले. पुन्हा नागपुरात परत आल्यास परिणाम गंभीर होतील, अशी धमकीही देण्यात आली. अपहृत कामगार सरथी पालटा सिंग (वय ४०, ओडिशा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीनंतर शिवीगाळ आणि मारहाण करीत चार ते सहा आरोपींनी सरथी तसेच अन्य ११ कामगारांना एमएच ४०/ एआर ४१२३ तसेच एमएच ४०/ एआर १८७४ क्रमांकाच्या टाटा सफारीत कोंबले. त्यांना रायपूर येथे नेले. तेथेही त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यानंतर चारपैकी एका आरोपीने ‘राऊकवार साहाबसे पंगा मत लेना नही तो गोली मार देंगे’ अशी धमकी दिली आणि पुन्हा परत येऊ नका, अशी दमदाटी करीत आरोपी पसार झाले. दरम्यान, यातील काही कामगार रविवारी नागपुरात परतले. त्यांनी ठेकेदाराला अपहरणाची माहिती दिली. ठेकेदाराने दिलेल्या सल्ल्यानुसार, एमआयडीसी ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण, मारहाण करणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. या घटनेची वार्ता कंपनी परिसरात पोहचताच खळबळ उडाली. प्रकरण चिघळण्याचे संकेत मिळाल्याने सोमवारी सकाळपासून पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. एमआयडीसी पोलिसांकडे यासंबंधाने संपर्क साधला अपहृत व्यक्ती किंवा फिर्यादी हे आरोपींना नावाने ओळखत नसल्यामुळे चौकशी सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड यांनी सांगितले.(प्रतिनिधी) लेबर कॉन्ट्रॅक्टरमधील स्पर्धा शहरातील विविध कंपन्या आणि प्रकल्पात कामगार पोहचविण्यासाठी अनेक कंत्राटदार कामी लागले आहेत. ते कंपनी किंवा प्रकल्पातील कामांचे कंत्राट घेतात अन् ठेका पद्धतीने हे काम दुसऱ्या कामगारांना सोपवितात. स्थानिक मजुरांच्या तुलनेत छत्तीसगड, मध्य प्रदेश, ओडिशा येथून आणलेल्या मजुरांना खूपच कमी मोबदला दिला जातो. बऱ्यापैकी पैसे मिळावे म्हणून ही बिचारी मंडळी रात्रंदिवस काम करतात. अनेकदा दुसऱ्या ठेकेदाराकडून कामगारांची पळवापळवीही होते. ओडिशातील सरथी सिंग आणि अन्य कामगार ८ सप्टेंबरला ठेकेदाराकडे कामाला लागली होती. ठेकेदारांमधील स्पर्धेतूनच हा अपहरणाचा प्रकार घडला असावा, असा संशय आहे.