शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

नागपूर जिल्ह्यात १२ सखी मतदान केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:10 IST

लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांमध्ये जागरुकता आणण्यासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने नवीन सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये विधानसभा क्षेत्रानिहाय पहिल्यांदा काही मतदान केंद्र वेगळ्या रंगात दिसणार आहे. निवडणुकीत आदर्श मतदान केंद्र (मॉडल पोलिंग बूथ) बरोबरच सखी मतदान केंद्र (ऑल वूमेन पोलिंग बूथ) बनविण्यात आले आहे.

ठळक मुद्देमतदान प्रक्रियेचे संचालन करणार महिला कर्मचारी व अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणुकीत महिला मतदारांमध्ये जागरुकता आणण्यासाठी निवडणूक आयोग व जिल्हा प्रशासनाने नवीन सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये विधानसभा क्षेत्रानिहाय पहिल्यांदा काही मतदान केंद्र वेगळ्या रंगात दिसणार आहे. निवडणुकीत आदर्श मतदान केंद्र (मॉडल पोलिंग बूथ) बरोबरच सखी मतदान केंद्र (ऑल वूमेन पोलिंग बूथ) बनविण्यात आले आहे. 

काय आहे संकल्पना निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकी दरम्यान नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा क्षेत्रात सखी मतदान केंद्राचे निर्माण करण्यात आले आहे. या मतदान केंद्रावर मतदानासंदर्भातील सर्व प्रक्रियेचे संचालन महिला कर्मचारी व अधिकारी करणार आहे. दिवसभर या केंद्रावर महिलाच कर्तव्य बजावणार आहे. केंद्राच्या सुरक्षेची जबाबदारीसुद्धा महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांवर राहणार आहे. सखी मतदान केंद्रावर पीठासीन अधिकाऱ्यापासून प्रथम, द्वितीय, तृतीय मतदान पदाधिकारी महिलाच राहणार आहे. येथे पोलीस सुरक्षा कर्मचारीसुद्धा महिला असणार आहे. या केंद्राचा उद्देश महिला निर्भीडपणे मतदान केंद्रावर पोहचून कुठलीही भीती न बाळगता आपल्या मताच्या अधिकाराचा वापर करू शकतील.जिल्ह्यात १२ केंद्रलोकसभा निवडणुकीत जिल्ह्यात १२ सखी केंद्राचा निर्माण करण्यात आले आहे. निवडणुक आयोगाच्या अधिकारीऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, नागपूर लोकसभेत ६ व रामटेकमध्ये ६ असे एकुण १२ केंद्र महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या विशेष मतदान केंद्रावर निवडणुक ड्युटीसाठी निवडक महिला कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.येथे आहे सखी मतदान केंद्रप्रतापनगर मराठी प्राथमिक शाळा रुम नंबर ३, महानगर पालिका दुर्गानगर मराठी प्राथमिक शाळा रुम नंबर २, केडीके कॉलेज नंदनवन रुम नंबर ४, मनपा चिंतेश्वर प्राथमिक शाळा जुनी मंगळवारी रुम नंबर १, विनियालय हायस्कूल मार्टिननगर रुम नंबर ७, मॉडर्न हायस्कूल सिव्हिल लाईन्स रुम नंबर १, श्री पंढरी कॉलेज नरखेड रुम नंबर ३, नगरपरिषद सुभाष मराठी प्राथमिक शाळा सावनेर रुम नंबर ३, जिंदल लोकांची शाळा वाडी रुम नंबर ४, पंचायत समिती कार्यालय उमरेड नगर परिषद कार्यालय कामठी, स्व. शिवाजी उराडे नगर परिषद प्राथमिक स्कूल रामटेक रूम नंबर २पिंक बूथ म्हणता येईल 
नागपूर व रामटेक लोकसभा क्षेत्रात १२ केंद्र बनविण्यात आले आहे. या मतदान केंद्राला पिंक बूथ म्हणण्यात येत आहे. हे बूथ पिंक रंगाने सजविण्यात आले आहे. केंद्रावर पिंक रंगाचे बलून लावण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की काही केंद्रावर महिला अधिकारी पिंक रंगाच्या साड्या नेसूनसुुद्धा येणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019