शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:29 IST

लाभार्थ्यांना अर्धे रेशन देऊन त्यांना पूर्ण कोट्याचे धान्य दिल्याचे दाखवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अन्न व पुरवठा विभागाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच विभागाने शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी सुरू केली आहे.

ठळक मुद्देअन्न पुरवठा विभागाने सुरू केली दुकानांची चौकशी : आठवडाभरात अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लाभार्थ्यांना अर्धे रेशन देऊन त्यांना पूर्ण कोट्याचे धान्य दिल्याचे दाखवण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत अन्न व पुरवठा विभागाने अतिशय कठोर भूमिका घेतली आहे. यासंदर्भात आलेल्या तक्रारीनुसार चौकशी करून १२ रेशन दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच विभागाने शहरातील सर्व रेशन दुकानांची चौकशी सुरू केली आहे.जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी ही माहिती दिली. लोकमतने प्रकाशित केलेल्या वृत्ताचा उल्लेख करीत त्यांनी सांगितले की, लाभार्थ्यांना त्यांच्या कोट्याचे धान्य वितरित न करणाऱ्या रेशन दुकानांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. लोकमतने १० नोव्हेंबर रोजी , धान्य कमी बिल जास्त’ या शिर्षकांतर्गत वृत्त प्रकाशित करीत रेशन दुकनातील काळाबाजार उघडकीस आणला होता. अंत्योदय योजना सुरु करण्यात आली आहे. याअंतर्गत लाभार्थ्यांना दोन रुपये किलो प्रमाणे २० किलो गहू, आणि ३ रुपये प्रति किलोप्रमाणे १५ किलो तांदूळ दिले जाते. यासोबतच ३५ रुपये किलो तूर डाळ आणि २० रुपये किलो साखर देण्याचीही तरतूद आहे. लाभार्थ्यांनुसार सर्व कागदोपत्री आहे. लाभार्थ्यांना गहू व तांदूळ कोट्यानुसार मिळत नाही. अर्धेच दिले जाते. बिल मात्र पूर्ण कोट्याचे दिले जाते. डाळ आणि साखर दिलीच जात नाही. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत निवेदनही सादर केले होते.यासंदर्भात विचारणा केली असता प्रशांत काळे यांनी अन्न व पुरवठा विभागातर्फे याची सखोल चौकशी केली जात असल्याचे सांगितले. प्रत्येक दुकानांची तपासणी केली जात आहे. चार ते पाच दिवसात अहवाल सदर केला जाईल. या आधरावर दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल. अशाच प्रकारे यापूर्वीही आलेल्या तक्रारीवर १२ दुकानांचे परवाने निलंबित केले असून आर्थिक दंडही ठोठावल्याचे त्यांनी सांगितले.तक्रार करण्याचे आवाहनकुठल्याही लाभार्थ्यास कोट्यापेक्षा कमी धान्य मिळत असेल. बिल दिले जात नसेल किंवा इतर काही समस्या असल्यास त्यांनी रेशन दुकानदाराची विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे यांनी केले आहे. आॅनलाईनही तक्रार करता येऊ शकते. लाभार्थ्यांची तक्रार आल्यास संबंधिताची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :foodअन्नGovernmentसरकार