शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

१२ लाखांवर नागपूरकर दारिद्र्यरेषेखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:00 IST

सरकार कुठल्याही पक्षाचे असो गरिबी दूर करण्याचा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दावा नेहमीच केला जातो.

ठळक मुद्दे२ लाख ४० हजार कुटुंबाचा समावेश : १,३१,९०५ बीपीएल, तर १,०८,६१७ अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबदारिद्र्य निर्मूलन दिन विशेष

आनंद डेकाटे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार कुठल्याही पक्षाचे असो गरिबी दूर करण्याचा आणि नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दावा नेहमीच केला जातो. परंतु हा दावा कितीही केला जात असला तरी वस्तुस्थिती वेगळीच आहे. एकट्या नागपुरात तब्बल २ लाख ४० हजार ६२२ कुटुंबातील १२ लाख ४७ हजार ५३ लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.नागपूर शहर व ग्रामीण भागातील शिधापत्रिकेचा विचार केला तर अतिशय भयावह चित्र समोर येते. सर्वधारणपणे बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती अशी समज आहे. परंतु शिधापत्रिकेचा विचार केला तर बीपीएलपेक्षाही खाली असलेली व्यक्ती म्हणजे अंत्योदय शिधापत्रिकाधारक होय. नागपुरात एकूण २ लाख ४० हजार अंत्योदय व बीपीएल शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. त्यांची एकूण सदस्य संख्या ही १२ लाख ४७ हजार ५३ इतकी आहे. नागपूर शहरात ३९,२०५ इतके अंत्योदय शिधापत्रिकाधारक तर ६१,८०५ बीपीएल कार्डधारक आहेत. त्यांची या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या ५ लाख ४८ हजार २५४ इतकी आहे. तर ग्रामीण भागात ६९,४१२ अंत्योदय व ७०,१५३ बीपीएल कार्डधारक आहेत. त्यांच्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्या ६,९८,७९ इतकी आहे. सरकारतर्फे रेशन दुकानातून अंत्योदय व बीपीएल कार्डधारकांना गहू व तांदूळ माफक दरात उपलब्ध करून दिले जाते. २०१४ पासून अन्न सुरक्षा योजना अंमलात आली. या योजनेनुसार एपीएल कार्डधारकांपैकी काही कुटुंबांनासुद्धा अन्नधान्य पुरवठा सुविधेचा लाभ दिला जातो. त्याला एपीएल प्राधान्यगट असे म्हटले जाते. नागपुरात तब्बल ३ लाख ५६ हजार ९२३ एपीएल कार्डधारकांना अन्नधान्य पुरवठ्याचा लाभ दिला जातो. अशा कार्डधारक कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या १६ लाख ९० हजार ६४१ इतकी आहे.रेशनकार्ड नसणाºयांची संख्याही मोठ्या प्रमाणावरअंत्योदय व बीपीएल रेशन कार्डधारकांची ही संख्या अधिकृतरीत्या आहे. परंतु नागपुरात रेशन कार्ड नसणाºया कुटुंबांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या यापेक्षाही अधिक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.