शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

१२ लाखांची निकृष्ट सुपारी जप्त

By admin | Updated: April 14, 2017 03:03 IST

अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहिमेंतर्गत बुधवारी तीन प्रतिष्ठानांवर कारवाई करून एकूण ९७३१ किलो निकृष्ट दर्जाच्या

अन्न व औषधी प्रशासन विभाग : तीन प्रतिष्ठानांवर कारवाईनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहिमेंतर्गत बुधवारी तीन प्रतिष्ठानांवर कारवाई करून एकूण ९७३१ किलो निकृष्ट दर्जाच्या सुपारीचा सुमारे १२ लाख रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी मनोज तिवारी, आनंद महाजन व प्रवीण उमप यांच्या पथकाने अक्कीनो ट्रेडर्स, जुना कामठी रोड या प्रतिष्ठानची तपासणी करून निकृष्ट दर्जाच्या संशयावरून विक्रीसाठी साठविलेली १९४८ किलो वजनाची ३ लाख ७० हजार रुपये किमतीची सुपारी जप्त केली. अन्य कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी किरण गेडाम व सीमा सुरकर यांच्या पथकाने भोपाळ-इंदोर रोड लाईन्स, ट्रान्सपोर्टनगर, भंडारा रोड या पेढीची तपासणी करून ३५८ किलो वजनाची ९४ हजार रुपये किमतीची निष्कृष्ट सुपारी जप्त केली. याशिवाय अन्न सुरक्षा अधिकारी अभय देशपांडे आणि शीतल देशपांडे यांच्या पथकाने मिरची बाजार चौक, इतवारी येथील रहीम गोडावूनची तपासणी केली. या कारवाईत ९४३ किलो वजनाची ५ लाख ४५ हजार रुपये किमतीची प्रतिबंधित सुगंधित सुपारी आणि ३४८८ किलो वजनाची ७ लाख ३४ हजार रुपये किमतीची निष्कृष्ट व सडलेली सुपारी जप्त केली. या जागेत प्रतिबंधित अन्नपदार्थांची साठवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने गोडावून पुढील तपासणीसाठी सील करण्यात आले. तिन्ही कारवाईत सदर साठ्यातून विश्लेषणाकरिता नमुने घेण्यात आले. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) शशिकांत केकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नागपूर कार्यालयातील सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे व मोतीराम पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आली.जनआरोग्याचा विचार करता या प्रकारची धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित व स्वादिष्ट तंबाखू, सुगंधित व स्वादिष्ट सुपारी व खर्रा इत्यादी प्रतिबंधित पदार्थांचे उत्पादन, वितरण, साठवण आणि विक्री होत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती द्यावी. जनतेने व विशेषत: युवा वर्गाने अशा अन्नपदार्थांचे सेवन करू नये, असे आवाहन शशिकांत केकरे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)