शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांच्याही कानावर १२ डिजिट नंबरचा टॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:29 IST

केंद्र सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारने जोडून, स्वतंत्र ओळख दिली आहे. हे आधार कार्ड आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे.

ठळक मुद्दे१ जुलैपासून सुरू झाली मोहिमेला सुरुवात : सरकारला मिळणार देशभरातील जनावरांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारने देशातील प्रत्येक व्यक्तीला आधारने जोडून, स्वतंत्र ओळख दिली आहे. हे आधार कार्ड आता शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकासाठी महत्त्वाचे दस्तऐवज झाले आहे. याच धर्तीवर आता केंद्र सरकारने जनावरांनासुद्धा आधारशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या फक्त दुधाळ जनावरांचा समावेश आहे. १ जुलैपासून नागपूर जिल्ह्यात या मोहिमेला सुरुवात झाली आहे. नोंद झालेल्या गाई आणि म्हशीला १२ डिजिट नंबरचा टॅग कानाला टोचला जात आहे.राज्यातील दुधाचे उत्पादन वाढविण्यासाठी, नष्ट होत असलेल्या देशी ब्रीडचे संगोपन करण्यासाठी, पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेतकºयांना मिळवून देण्यासाठी जनावरांना आधारशी जोडल्या जात आहे. केंद्र सरकारच्या नॅशनल मिशन फॉर बोव्हाईन प्रोडक्टीव्हीटी मोहिमेंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. आजपर्यंत जनगणनेसारखी पशुगणनाही होत होती. परंतु पशुगणनेत त्या पशूची पुरेशी माहिती उपलब्ध होत नव्हती. २०१२ च्या पशुगणनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख १० हजार दुधाळ जनावरांची नोंद आहे. केंद्र सरकारने प्रत्येक पशूला आधार क्रमांकाच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख देण्याचा कार्यक्रम राबविला आहे. नागपूर जिल्ह्यात १ जुलैपासून या मोहिमेला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात १७६ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. दवाखान्यातील डॉक्टर व पर्यवेक्षकाच्या माध्यमातून पशूची नोंदणी करण्यात येत आहे. पशूंना १२ डिजिटचा आधार नंबर देताना इत्थंभूत माहिती जसे, पशूचा जन्म, वय, प्रजननाचा अवधी व संगोपन करणाºया शेतकºयाचे नाव आदी माहिती नोंदविण्यात येत आहे. ही माहिती एका सॉफ्टवेअरमध्ये डाऊनलोड करण्यात येत आहे.आधारचे फायदेआधार नोंदणीमुळे जनावरांचे ब्रीडिंग, न्यूट्रीशन, आरोग्य याची इत्थंभूत माहिती पशुसंवर्धन विभागाला मिळणार आहे. त्याचबरोबर जनावरांचे लसीकरण, जनावरांची आॅनलाईन विक्री, जनावरांची संख्या, विभागातर्फे पशूंसाठी राबविण्यात येणाºया योजनांची अंमलबजावणी, हरविलेल्या जनावरांची सहज ओळख पटणार आहे. गोरक्षणाचा भार व कोंडवाड्याचा खर्च कमी होणार आहे.केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. भविष्यात याचा लाभ होणार आहे. सध्या दुधाळ जनावरांना आधार क्रमांक देण्यात येत आहे. पशूच्या संदर्भातील अख्खी शासकीय यंत्रणा यात जोडली जाणार आहे. सध्या जिल्ह्यात ६०० जनावरांना आधार क्रमांक दिला गेला आहे.डॉ. राजेंद्र रेवतकर,पशुधन विकास अधिकारी