शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.च्या ११७ कर्मचाऱ्यांवर गाज

By admin | Updated: July 11, 2017 01:38 IST

जात पडताळणी प्रमाणपत्र बोगस सादर करणाऱ्या जि.प.च्या ११७ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गाज आली आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही : विधिमंडळाच्या अनु.जमाती कल्याण समितीने केली विचारणालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जात पडताळणी प्रमाणपत्र बोगस सादर करणाऱ्या जि.प.च्या ११७ कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गाज आली आहे. नुकतीच विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीपुढे जि.प.ची साक्ष झाली असता, हा विषय ऐरणीवर आला आहे. जि.प. प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावल्याची माहिती आहे. सोबतच प्रमाणपत्र सादर करण्यास एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. शासकीय सेवेत रुजू होतानाच कर्मचाऱ्यांना आपले जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याला त्वरित प्रमाणपत्र सादर करणे शक्य नसेल तर त्याला सहा महिन्यांची मुदत दिली जाते. किंबहुना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला असल्यास त्यासंदभार्तील पुरावा सादर करणेही क्रमप्राप्त असते. जात पडताळणीचा प्रमाणपत्राचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला असून, त्यात जि.प.च्या शिक्षकांसह ११७ कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात असून, यात शिक्षण विभागाची आकडेवारी अव्वल स्थानावर आहे. दिलेल्या मुदतीत संबंधित कर्मचाऱ्यांनी हे प्रमाणपत्र तत्काळ सादर करावे. यापूर्वीच सादर केले असल्यास ही बाब प्रशासनास निदर्शनास आणून द्यावी, म्हणून एक संधी प्रशासनाने दिली आहे. विधिमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीसमोर सीईओंची साक्ष झाली. त्यावेळी बोगस अनुसूचित जमातीच्या कर्मचाऱ्यांवर काय कारवाई केली? अशी विचारणा समितीकडून करण्यात आली होती. आता सीईओंनी बोगस जातीचे प्रमाणपत्र दाखल करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे धोरण अवलंबिले आहे. सीईओंनी घेतली बैठकयासंदर्भात सीईओ डॉ. कादंबरी बलकवडे यांनी शिक्षणाधिकारी, डेप्युटी सीईओ प्रमिला जाखलेकर यांची बैठक घेतली. अनुसूचित जमाती प्रवगार्तून किती कर्मचारी नोकरीला लागले. किती कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले, याचा आढावा घेतला जात आहे. बोगस जातीचे प्रमाणपत्र देऊन नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांना घरी पाठविण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अपडेट आकडेवारी घेण्याचे काम सुरूशिक्षण विभागात सुमारे ३४० अनुसूचित जमातीचे कर्मचारी कार्यरत असून, यापैकी किती शिक्षक कर्मचाऱ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही, याबाबत अपडेट आकडेवारी घेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे किती लोकांना नोकरीवरून कमी केले जाईल किंवा नाही हे सांगणे सध्या तरी कठीण असल्याचे शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी सांगितले.