शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षांत विद्यापीठाच्या खर्चात ११० कोटींनी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:07 IST

योगेश पांडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ऑनलाइन सुधारणांवर जास्त भर देण्यात येत असला ...

योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ऑनलाइन सुधारणांवर जास्त भर देण्यात येत असला तरी मागील पाच वर्षांत विद्यापीठाचा खर्च तब्बल ११० कोटींनी वाढला आहे. पाच वर्षांत वेतन वगळता विविध बाबींवर बाराशे कोटींहून अधिक निधी खर्च झाला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पायाभूत सुविधांची वाढ करण्यासाठी यातील केवळ ८.८० टक्के इतकीच रक्कम खर्च करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांवरील इतका कमी आकडा लक्षात घेता विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या सुविधा कशा उपलब्ध होतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

२०१५-१६ या वर्षात शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन वगळता १९२ कोटी ६४ लाख २९ हजार रुपयांचा खर्च झाला होता. २०१९-२० मध्ये यात ५७.६१ टक्क्यांनी वाढ झाली व खर्च ३०३ कोटी ६२ लाख ५६ हजारांवर गेला. २०१८-१९ मध्ये सर्वाधिक ३४७ कोटी १ लाख ७७ हजार इतकी रक्कम खर्च झाली. दरवर्षी नव्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर मात्र फारच कमी रक्कम खर्च करण्यात आली. पाच वर्षांतील एकूण खर्च हा १०८ कोटी १५ लाख १३ हजार इतका ठरला. २०१५-१६ साली एकूण खर्चाच्या तुलनेतील आकडा केवळ १६ कोटी ६४ लाख ९७ हजार इतका होता व ही टक्केवारी ८.६४ टक्के इतकीच होती, तर २०१९-२० मध्ये पायाभूत सुविधांच्या वाढीवर १६ कोटी ८ लाख २८ हजारांची रक्कम खर्च झाली व खर्चाची टक्केवारी घटून ५.३० टक्के इतकी झाली. काळासोबत पायाभूत सुविधांवरील खर्च वाढणे अपेक्षित होते. मात्र, २०१५-१६ च्या तुलनेत २०१९-२० मध्ये पायाभूत सुविधांवरील खर्चातदेखील ३.४० टक्क्यांनी घट झाली.

पुस्तक व ई-जर्नल्ससाठी केवळ साडेतीन कोटींचा खर्च

विद्यार्थ्यांना दर्जेदार पुस्तके व ई-जर्नल्स आवश्यक संख्येत उपलब्ध करून देण्याची गरज आहे. मात्र, नागपूर विद्यापीठाने याकडे फार गंभीरतेने पाहिलेले नाही. पाच वर्षांत विविध बाबींवर बाराशे कोटींचा खर्च झाला असताना पुस्तके व ई-जर्नल्सच्या खरेदीसाठी केवळ साडेतीन कोटींचाच खर्च करण्यात आला. २०१५-१६ साली सर्वाधिक १ कोटी ५२ लाख ४ हजार रुपये खर्च झाले.

विद्यापीठाचा वर्षनिहाय खर्च (रुपयांमध्ये)

वर्ष : एकूण खर्च (वेतन वगळता) : पायाभूत सुविधांवरील खर्च : पुस्तकांवरील खर्च

२०१५-१६ : १,९२,६४,२९,००० : १६,६४,९७,००० : ४४,८७,०००

२०१६-१७ : १,७३,१७,९७,००० : २०,९३,८९,००० : १,५२,०४,०००

२०१७-१८ : २,१३,५३,२३,००० : २६,२४,३६,००० : ६३,७७,०००

२०१८-१९ : ३,४७,०१,७७,००० : २८,२३,६३,००० : ५३,५४,०००

२०१९-२० : ३,०३,६२,५६,००० : १६,०८,२८,००० : ४६,५८,०००