शहरं
Join us  
Trending Stories
1
वीज कमी वापरणाऱ्यांना स्वस्त दर; जास्त वापरल्यास बिलात ‘झटका’, किती युनिटपर्यंत दिलासा?
2
आजचे राशीभविष्य - २६ जून २०२५, या राशीच्या मंडळींना सरकारकडून लाभ होईल, धन, मान-सन्मान वाढेल
3
चांदीच्या ताटात न दिलेल्या जेवणाची चर्चा जोरदार; आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा
4
अहिल्यानगर हादरले! आठवीच्या विद्यार्थ्याने केला दहावीच्या विद्यार्थ्याचा खून; क्रिकेटचा वादातून शाळेतच संपवले
5
पंचगंगा, चंद्रभागेला पूर, भीमा नदीत ६३ हजार क्युसेकचा विसर्ग सुरू; विदर्भाला पावसाचा दिलासा 
6
अग्रलेख: इराण विरुद्ध इस्रायल; युद्ध संपले, की तात्पुरते थांबले?
7
समृद्धी महामार्गावर आता २४ तास खड्डे दुरुस्तीपथक; देखभाल-दुरुस्तीचे काम कंत्राटदारामार्फत नियमित
8
जमीन सरकारी, वापरण्याचा हक्क सरकारलाच; मोघरपाड्यात मेट्रो कार शेड उभारण्याचा मार्ग मोकळा
9
‘गडकरी’ सुरू झाल्याखेरीज ‘घाणेकर’ बंद होणार नाही! ठाणे महापालिकेने मांडली स्पष्ट भूमिका
10
विशेष लेख: माझ्या मनात पाल का चुकचुकते आहे?
11
विधानसभा निकाल रद्द करण्याची मागणी फेटाळली; याचिका करून कोर्टाचा वेळ वाया घालवला : हायकोर्ट
12
एसटी महामंडळाच्या २ हजार बसेस भंगारात; ‘एमएसटीसी’च्या माध्यमातून करण्यात येणार लिलाव
13
भरती-ओहोटीचे सर्वेक्षण वाढवणवासियांनी उधळले; आयटीडीसी पथकाला पिटाळले
14
उद्योगस्नेही वातावरणामुळे महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक गुंतवणूक -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
15
तरुणांनी प्रामाणिकपणा, नवकल्पनांसह परंपरा पुढे न्यावी : मंत्री आदिती तटकरे
16
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
17
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
18
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
19
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
20
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”

मनपाच्या उपविभागीय अभियंत्याला ११ हजारांचा दंड

By admin | Updated: April 9, 2016 03:04 IST

महापालिके च्या आशीनगर झोनचे उपविभागीय अभियंता अनिलकुमार नागदिवे यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्याला ४७ दिवसांचा विलंब

माहिती देण्याला ४७ दिवसांचा विलंबनागपूर : महापालिके च्या आशीनगर झोनचे उपविभागीय अभियंता अनिलकुमार नागदिवे यांनी माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्याला ४७ दिवसांचा विलंब केल्याने,राज्य माहिती आयुक्त वसंत पाटील यांनी त्यांना ११,७५० रुपयांचा दंड (शास्ती)ठोठावला आहे. जरीपटका येथील भाऊ साहेब भालेराव यांनी जनमाहिती अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अनिलकुमार नागदिवे यांच्याकडे २१ आॅगस्ट २०१४ रोजी माहिती अर्ज सादर केला होता. परंतु नागदिवे यांच्याकडून माहिती न मिळाल्याने भालेराव यांनी महापालिकेचे अपिलीय अधिकारी तथा नगरयंत्री यांच्याकडे अपील केले. त्यानंतर त्यांनी दुसरे अपील आयोगाकडे केले होते. जन माहिती अधिकाऱ्यांनी अपीलार्थीच्या अर्जावर विहित मुदतीत माहिती उपलब्ध केलेली नाही. ही बाब गंभीर असून माहिती अधिकार अधिनियमाच्या तरतुदीचा भंग करणारी आहे. अर्जात मागितल्यानुसार अर्जदाराला माहिती देणे आवश्यक असते अथवा माहिती उपलब्ध नसल्यास तसे लेखी पत्र देणे गरजेचे होते. नियमानुसार मागितलेली माहिती संबंधित कार्यालयाशी संबंधित नसेल तर, प्राप्त अर्ज संबंधित विभागाकडे पाठवून अर्जदाराला माहिती पुरवावी लागते. परंतु नागदिवे यांनी माहिती देण्याला ४७ दिवसांचा विलंब लावला. त्यामुळे प्रतिदिन २५० रुपयाप्रमाणे ११,७५० रुपयांचा दंड का आकारण्यात येऊ नये, अशी विचारणा करून याबाबतचा खुलासा आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागदिवे यांनी आयोगाकडे खुलासा केला होता. परंतु जन माहिती अधिकारी यांनी विहित मुदतीत माहिती उपलब्ध केली नसल्याचे आयोगाच्या निदर्शनास आले. त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन ही बाब गंभीर आहे. माहिती अधिकार अधिनियमाच्या तरतुदीचा र्भग करणारी असल्याने नागदिवे यांना दंड ठोठावण्यात आला. ही रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करून शासनाकडे जमा करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)