आॅनलाईन लोकमतपरतवाडा : अचलपूर पोलिसांनी टाकलेल्या दोन वेगवेगळ्या धाडीत ११ लाख ३५ हजार रुपयांचा गुटखा घरातून जप्त करीत आरोपींना ताब्यात घेण्यात आले. साजीद खाँ महमुद खाँ (४०, रा.ठिकरीपुरा) व मुक्तार खाँ सत्तार खाँ (५५, रा. चावलमंडी अचलपूर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर ठाणेदार आधारसिंग सोनोने, पीएसआय ब्राम्हण, सुनील खारोडे, संजय ठाकरे, विनोद राऊत, रवि बावने, सचिन भोंबे आदींच्या पथकाने साजीद खाँ महम्मद खाँ यांच्या घराची झडती घेतली असता ११ लाख २० हजार रुपयांचा गुटखा पोते आढळून आले. सोमवारी सकाळी १० वाजता चावलमंडी येथील मुख्तार खाँ सत्तार खाँ यांच्या जवळून पंधरा हजाराचा अवैध गुटखा पकडण्यात आला. पोलिसांनी सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा अवैध गुटखाविरुद्ध कारवाई केल्याने जुळ्या शहरात मोठ्या प्रमाणात गुटख्याचे गोदाम असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्यात गुटखा बंदी असताना लाखो रुपयांचा गुटखा घरामध्ये गुटखा तस्करांनी डांबून ठेवल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.
अचलपुरात ११ लाखांचा गुटखा जप्त
By admin | Updated: May 31, 2017 16:16 IST