शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

११ कोटी ४० लाख गेले परत

By admin | Updated: April 3, 2015 01:52 IST

चकचकीत खासगी रुग्णालयांंमधील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी

मेडिकल, मेयो, सुपर व दंत रुग्णालय : यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी मिळाला होता निधीनागपूर : चकचकीत खासगी रुग्णालयांंमधील खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी आरोग्य सेवेचे सबलीकरण करणे, त्यांची विश्वासार्हता वाढवणे, अद्ययावत उपकरण देणे, त्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. सरकार आपल्यापरीने तसे प्रयत्नही करते. परंतु लालफितशाहीमुळे यावर पाणी फेरले जात आहे. गोरगरिबांचे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या मेडिकल, सुपर स्पेशालिटी, मेयो व दंत रुग्णालयाला उपकरणे खरेदीसाठी शासनाने निधी दिला. परंतु ३१ मार्चपर्यंत खरेदीला प्रशासकीय मान्यताच मिळाली नसल्याने ११ कोटी ४० लाखांचा निधी परत गेला आहे.शासकीय रुग्णालयांमध्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुविधा, साधने यांची भीषण कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी विदर्भ वैधानिक विकास मंडळाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ३ कोटी ९ लाखांचा विशेष निधी दिला. याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेतून शासकीय रुग्णालयांना यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेयो) १ कोटी ५० लाख, मेडिकलला २ कोटी, शासकीय दंत रुग्णालयाला १ कोटी ७० लाख, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला ३ कोटी २६ लाख रुपये असा ८ कोटी ४६ लाखांचा निधी मिळाला. गरीब रुग्णांवर उपचार करणाऱ्या या रुग्णालयांना मंजूर झालेल्या निधीला तत्काळ प्रशासकीय मंजुरी मिळेल, ही अपेक्षा होती. परंतु, प्रशासकीय मान्यतेअभावी मंजूर निधी खर्च झाला नाही. वैद्यकीय संचालक कार्यालयाकडून खर्चासाठी मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला असता तर हा निधी या रु ग्णालयांना मिळाला असता, असे सूत्रांचे म्हणणे आहे. मिळालेल्या निधीमधून फक्त ९४ लाखांचाच निधी खर्च झाल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातील शासकीय संस्थेला मंजूर निधीला प्रशासकीय मंजुरी मिळाली नसल्याची खंत व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)परत गेलेला निधीविदर्भ वैधानिक विकास मंडळ मेडिकल - ३ कोटी ९ लाखजिल्हा वार्षिक योजनामेयो - १ कोटी ५० लाखमेडिकल - २ कोटी दंत रुग्णालय - १ कोटी ७० लाखसुपर स्पेशालिटी - ३ कोटी २६ लाखइतर कामांसाठी दिला निधीमेडिकल, मेयो, दंत रुग्णालय प्रशासनाने निधी खर्च न झाल्याने ३१ मार्चपर्यंत सायंकाळी नियोजन विभागाकडे परत केला. मात्र या विभागाने प्राप्त निधी शासनाकडे परत पाठविण्याऐवजी ज्या इतर विभागांनी निधींची मागणी केली होती, त्यांना तो उपलब्ध करून दिला.तांत्रिक अडचणींमुळे निधी परत गेलामेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी रुग्णालयांसाठी आवश्यक यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी निधी मिळाला, परंतु वाढीव मुदत मिळाली नाही. तांत्रिक अडचणींमुळे हा निधी परत गेला.डॉ. प्रवीण शिनगारेसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग