शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

११९ उमेदवार संकटात

By admin | Updated: April 12, 2017 01:44 IST

निवडणूक आयोगाने उमेदवारांसोबतच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब सादर करण्यासंदर्भात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे.

मनपा निवडणुकीचा हिशेब दिलाच नाही : भाजपाने सादर केला लेखाजोखा नागपूर : निवडणूक आयोगाने उमेदवारांसोबतच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब सादर करण्यासंदर्भात कठोर भूमिका घेण्याचे संकेत दिले आहे. परंतु भाजपा वगळता अन्य राजकीय पक्षांनी अद्याप निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल निवडणूक विभागाकडे सादर केलेला नाही. महापालिका निवडणुकीत ११३५ उमेदवार मैदानात होते. यातील ११९ उमेदवारांनी निर्धारित कालावधीत निवडणूक खर्चाचा अंतिम अहवाल निवडणूक विभागाक डे सादर केलेला नाही. अशा उमेदवारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी नागपूर दौऱ्याप्रसंगी खर्चाचा अहवाल सादर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले. महापालिका निवडणुकीत राष्ट्रीय पक्षासह ३१ पक्ष व अपक्ष अशा ११३५ उमेदवारांनी निवडणूक लढविली. महापालिकेच्या १५१ सदस्यांपैकी १०८ सदस्य भाजपाचे आहेत. यातील भाजपाचे नगरसेवक नीलेश कुंभारे यांचे निधन झाले. या जागेसाठी सहा महिन्यात पुन्हा निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणूक आयोगाने उमेदवारांना ३० दिवसांत तर राजकीय पक्षांना ६० दिवसांत निवडणूक खर्चाचा विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. उमेदवारांनी खर्चाचा अहवाल सादर करण्याची मुदत संपली आहे. राजकीय पक्षांना २३ एप्रिलपर्यंत खर्चाचा अहवाल सादर करावयाचा आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना अजून काही दिवस मुदत आहे. निवडणूक विभागाच्या माहितीनुसार हनुमाननगर झोनमधील ६९ उमेदवार, नेहरूनगर ९२ व आसीनगर झोनमधील १३५ अशा सर्व उमेदवारांनी शपथपत्रासह निवडणूक खर्चाचा अहवाल सादर केला आहे. आरबीजीजी झोनमधील सर्वाधिक २७ उमेदवारांनी खर्चाचा अहवाल सादर केलेला नाही. (प्रतिनिधी)तीन वर्षे निवडणूक लढण्याला बंदीशपथपत्रासह निवडणूक खर्चाचा हिशेब सादर न के ल्यास संबंधित उमेदवारांवर निवडणूक आयोगामार्फत कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा उमेदवारांना तीन वर्षे कोणतीही निवडणूक लढण्याला बंदी घालण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षाने हिशेब सादर न केल्यास आयोग अशा पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवू शकतो. कारवाईचे अधिकार आयोगाकडे सुरक्षित आहेत. पराभूत उमेदवारांनी नाही दिला हिशेबनिवडणूक विभागाकडे खर्चाचा हिशेब सादर न करणाऱ्यांत कोणत्याही नगरसेवकांचा समावेश नाही. भाजपाच्या सर्व उमेदवारांनी हिशेब सादर केला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, शिवसेना व रिपाइं यांच्यासह बहुसंख्य अपक्ष उमेदवारांनी खर्चाचा हिशेब सादर केलेला नाही. बहुसंख्य उमेदवारांनी खर्चाचा आकडा निवडणूक विभागाला दिला आहे. परंतु हा खर्च कशासाठी करण्यात आला, याबाबतचा विस्तृत अहवाल व शपथपत्र सादर केलेले नाही.