शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘१०८’ रिडायलला घेऊन चौकशी

By admin | Updated: June 28, 2017 02:55 IST

गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असली तरी

आरोग्य संचालकांनी घेतली दखल : ‘आॅपरेटर्स’ना दिल्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभागाने १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली असली तरी पहिल्या प्रयत्नात हा क्रमांक लागत नाही. वारंवार ‘रिडायल’ केल्यावरच लागतो. यात बराच वेळ जातो. यामुळे ऐनवेळी दुसरा पर्याय निवडावा लागतो. याचे वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात मांडताच राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालकांनी याची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत.अपघातातील जखमी, हृदयविकाराच्या झटका आलेल्या किंवा गंभीर रुग्णांना जागेवरच प्राथमिक वैद्यकीय सेवा देत शासकीय रुग्णालयात पोहचविण्यासाठी शहरात १०८ क्रमांकाच्या २२ रुग्णवाहिकेची मदत घेतली जाते. यातील सहा ‘अ‍ॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ तर १६ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका आहेत. परंतु ‘१०८’ हा ‘टोल फ्री’ क्रमांकच पहिल्या प्रयत्नात लागतच नाही. पलीकडून ‘पुन्हा प्रयत्न करा’ असे उत्तर मिळते. वारंवार ‘रिडायल’ करण्याची वेळ येते. यात बराच वेळ जातो. नंबर लागला तर हा ‘कॉल’ सुरुवातीला ‘पुणे’ येथे जातो. तेथील ‘आॅपरेटरला’ नागपूरची माहिती नसल्याने त्याला पत्ता समजवण्यात वेळ जातो. त्या आॅपरेटरला पत्ता समजल्यावरच नागपूरच्या संबंधित रुग्णवाहिकेच्या डॉक्टरशी नंबर जुळवून देतो. या डॉक्टरलाही पत्ता समजावून सांगावा लागतो. या तांत्रिक अडचणीमध्ये आणखी वेळ जातो. रुग्णवाहिका येईपर्यंत रुग्णाचे नातेवाईक दुसऱ्या वाहनांचा पर्याय शोधतात. यामुळे अनेकवेळा या रुग्णवाहिकेला विनारुग्ण परतावे लागते. परिणामी, ‘१०८’ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ‘लोकमत’ने याचे ‘स्टींग आॅपरेशन’ करून ‘१०८ नंबरला साडेसाती’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. या वृत्ताला घेऊन आरोग्य विभागात खळबळ उडाली. आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. संबंधित ‘आॅपरेटर्सना’ याबाबत सूचना देऊन सिस्टीम सुधारण्याच्या सूचना दिल्या.‘१०८ रुग्णवाहिकेसाठी ‘अ‍ॅप’१०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी आता मोबाईल ‘अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपवर केवळ एकच क्लिक केल्यास १० सेकंदात रुग्णवाहिका सर्व्हिसच्या कॉल सेंटरवर संदेश जातो व काही वेळातच रुग्णवाहिका घटनास्थळी वैद्यकीय मदतीसाठी हजर होते. याची मदत घ्यावी, असे आवाहनही डॉ. पवार यांनी केले. लवकरच सिस्टीम सुरळीत होईलपहिल्याच प्रयत्नात ‘१०८’ क्रमांक लागत नाही, या ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेण्यात आली आहे. चौकशी सुरूही झाली आहे. नेमकी समस्या कुठे आहे, याची माहिती घेतली जाऊन लवकरच ही सिस्टीम सुरळीत करण्याचा प्रयत्न राहणार आहे. परंतु हा क्रमांक लागताच सहा रिंगच्या आत फोन घेतला जातो. असे न झाल्यास संगणक याची नोंद घेऊन संबंधितावर कारवाई होते. -डॉ. सतीश पवारसंचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग