शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

१०.१७ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा/बेला : खापरखेडा (ता. सावनेर) आणि बेला (ता. उमरेड) पाेलिसांनी केलेल्या दाेन वेगवेगळ्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

खापरखेडा/बेला : खापरखेडा (ता. सावनेर) आणि बेला (ता. उमरेड) पाेलिसांनी केलेल्या दाेन वेगवेगळ्या कारवाईमध्ये रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक करणारा ट्रक व ट्रॅक्टर पकडला. यात वाहन चालकांवर गुन्हा नाेंदविण्यात आला असून, त्यांच्याकडून एकूण १० लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या दाेन्ही कारवाई शनिवारी करण्यात आल्या.

खापरखेडा पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना, त्यांना वलनी (ता.सावनेर) शिवारातून रेतीची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची पाहणी केली, तेव्हा त्यांना एमएच-४०/बीएफ-७२१७ क्रमांकाचा ट्रक येताना दिसला. त्यांनी हा ट्रक थांबवून झडती घेतली असता, त्यात त्यांना रेती असल्याचे आढळून आले. कागदपत्रांच्या तपासणीअंती ती रेतीची विनाराॅयल्टी वाहतूक असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पाेलिसांनी ट्रकचालक माेसीन हसन शेख, रा.जगदीशनगर, काटाेल राेड, नागपूर याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला, शिवाय त्याच्याकडून सहा लाख रुपयांचा ट्रक आणि १२ हजार रुपयांची सहा ब्रास रेती असा एकूण ६ लाख १२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

दुसरी कारवाई बेला पाेलिसांनी गस्तीदरम्यान सिर्सी (ता. उमरेड) शिवारात शनिवारी केली. पाेलिसांचे पथक सिर्सी शहरातून जात असताना त्यांना एमएच-३४/एल-३९२३ क्रमांकाचा ट्रॅक्टर जाताना दिसला. संशय आल्याने पाेलिसांनी हा ट्रॅक्टर थांबवून झडती घेतली. त्या ट्रॅक्टरच्या ट्राॅलीत रेती आढळून येताच पाेलिसांनी कागदपत्रांची तपासणी केली. ती रेती विनाराॅयल्टी असल्याचे चाैकशीत स्पष्ट झाल्याने पाेलिसांनी ट्रॅक्टर चालक मुकेश आनंदराव लेंडे, रा. सिर्सी, ता. उमरेड याच्याविरुद्ध गुन्हा नाेंदविला. त्याच्याकडून चार लाख रुपयांचा ट्रॅक्टर व पाच हजार रुपयांची एक ब्रास रेती असा एकूण ४ लाख ५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या दाेन्ही प्रकरणात खापरखेडा व बेला पाेलिसांनी ट्रक व ट्रॅक्टर चालकांसह मालकांवर भादंवि ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनांचा पुढील तपास अनुक्रमे पाेलीस उपनिरीक्षक अंधारे व पाेलीस हवालदार अशाेक जाधव करीत आहेत.