शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात १०१ निवडणूक कर्मचाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 22:43 IST

निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपालाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. नागपूर जिल्ह्यात निवडणुकीकरिता १९ हजार कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली असून, १०१ कर्मचाऱ्यांनी टपाल मतदानाचा हक्क बजावला. यासाठी निवडणूक विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली होती.

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने केली विशेष व्यवस्था : सुविधा केंद्राद्वारे टपाली मतपत्रिकांचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या कामात व्यस्त असलेल्या कर्मचाऱ्यांना टपालाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावता येतो. नागपूर जिल्ह्यात निवडणुकीकरिता १९ हजार कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली असून, १०१ कर्मचाऱ्यांनी टपाल मतदानाचा हक्क बजावला. यासाठी निवडणूक विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली होती.निवडणूक कामाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका, निवडणूक कार्य प्रमाणपत्राकरिता अर्जाचे नमुने द्वितीय प्रशिक्षणाच्या वेळी देण्यात येऊन हे फार्म सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयाकडे जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ज्या कर्मचाऱ्यांनी मतपत्रिकांकरिता अर्ज सादर केले, त्यानुसार टपाली मतपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. टपाली मतपत्रिकेचे वाटप व मतदान करणे सुलभ व्हावे यासाठी ७ एप्रिल रोजी संबंधित सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते.जिल्हास्तरावरील सुविधा केंद्र स्थापन करण्यात येऊन कर्मचाºयांना ३४ टपाली मतपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे. तसेच आज जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या सुविधा केंद्रात एकूण ६७ टपाली मतपत्रिकांचे वाटप करण्यात आले आहे.कुणीही वंचित राहणार नाहीजे कर्मचारी केंद्रात टपाली मतपत्रिका घेण्यास उपस्थित झाले नाही त्यांच्या मतपत्रिका पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार असून, त्यांना २३ मे रोजी सकाळी ७.५९ वाजेपूर्वी टपाली मतदान करता येणार असल्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुदगल यांनी स्पष्ट केले आहे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019