शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

१००वा दीक्षांत समारंभ उद्या

By admin | Updated: September 25, 2014 01:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा बहुप्रतीक्षित शंभरावा दीक्षांत समारंभ शुक्रवार २६ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण

नागपूर विद्यापीठ : माजी राष्ट्रपती कलाम राहणार उपस्थितनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा बहुप्रतीक्षित शंभरावा दीक्षांत समारंभ शुक्रवार २६ सप्टेंबरला आयोजित करण्यात आला आहे. अमरावती मार्गावरील विद्यापीठाच्या रावबहादूर डी. लक्ष्मीनारायण क्रीडांगणावर माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रमुख उपस्थितीत दीक्षांत समारंभ पार पडणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी एसएफएस महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्रियंका बेरत्रमला सर्वाधिक १७ पदकांनी सन्मानित करण्यात येणार आहे.दीक्षांत समारंभाला मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. अभय बंग, राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. संजय चहांदे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे शंभराव्या दीक्षांत समारंभात सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांना मानद डी. लिट. प्रदान केली जाणार आहे. ४३७ पदकांचे वाटप दीक्षांत समारंभात २०१२ च्या उन्हाळी व हिवाळी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ६९ हजार ९४१ विद्यार्थ्यांना स्नातक व स्नातकोत्तर पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत. तसेच विविध परीक्षांमधील १८४ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना २९२ सुवर्ण पदके, ४३ रौप्य पदके, १०२ पारितोषिके अशी एकूण ४३७ पदके आणि पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.(प्रतिनिधी)प्रियंका बेरत्रमला सर्वाधिक पदकएसएफएस महाविद्यालयाच्या प्रियंका बेरत्रम हिचा सर्वाधिक १७ पदके व पारितोषिकांनी सन्मान करण्यात येणार आहे. ती बी.एस्सी. अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी होती. त्याखालोखाल दीक्षाभूमी येथील डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा आशुतोष मधुकर आपटे व जी.एच. रायसोनी कॉलेज आॅफ लॉ येथील खुशबू दिलीप छाजेड यांनी एलएलबी (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेत प्रत्येकी १५ पदके प्राप्त केली आहेत. ब्रह्मपुरी येथील डॉ. आंबेडकर कला-वाणिज्य महाविद्यालयाच्या नरेश माणिकराव मोरे एमए (इतिहास) या विषयात सर्वाधिक गुणांसह ११ पदकांचा मानकरी ठरला आहे.