शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दररोज तयार होणार १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 10:11 IST

भांडेवाडी येथे शहरातील कचरा साठविला जातो. कचरा प्रक्रि या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे.

ठळक मुद्देडम्पिंगयार्डची २१ एकर जागा रिकामी होणारबायोमायनिंगचे यश  

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भांडेवाडी येथे शहरातील कचरा साठविला जातो. कचरा प्रक्रि या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. मात्र बायोमायनिंगची प्रक्रिया सुरू आहे. याचे चांगले परिणाम दिसत आहे. मे महिन्यापासून दर महिन्याला भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथील एक एकर जागा रिकामी होणार आहे. काही महिन्यात भांडेवाडी येथील २१ एकच जागा रिकामी होईल. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना होणारा दुर्गंधीचा त्रास कायमचा बंद होणार आहे.भांडेवाडी येथे ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रि या करण्याचा प्रकल्प उभारला जाणार आहे. यातून दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण होणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या विचाराधीन आहे. मात्र यासाठी नियुक्त करण्यात आलेली कंपनी तातडीने प्रकल्प उभारण्यास तयार दिसत नाही. स्वच्छ सर्वेक्षणात शहर माघारल्याने स्वच्छतेवर प्रशासनाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. परंतु कचऱ्यावरील प्रक्रिया प्रकल्प राबविताना यातून निर्माण होणाऱ्या जैव उत्पादनातून महापालिकेला उत्पन्न व्हावे. या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली.भांडेवाडी डम्पिंगयार्ड येथे काही वर्षापूर्वी हंजर कंपनी कचऱ्यापासून खत तयार करण्याचे काम करीत होती. परंतु या खताला मागणी नव्हती. अशा परिस्थितीत दररोज १०० मेट्रिक टन कंपोस्ट खत निर्माण झाल्यास त्याचा वापर कुठे करावा असा प्रश्न उभा राहू नये यासाठी नियोजन करावे लागणार आहे. बायोडिझेल व सीएनजी निर्माण केल्यास महापालिकेच्या बसेस त्यावर चालविता येईल. यातून आर्थिक बचत होईल. याचा विचार करता बायोडिझेल व सीएनजी प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न असल्याचे बांगर यांनी सांगितले.

हनुमाननगर झोनचे ट्रान्सफर स्टेशन सुरूमहापालिकेच्या दहा झोनमध्ये दहा कचरा ट्रान्सफर स्टेशन बनविण्याचा प्रस्ताव आहे. एप्रिलपर्यंत जागा निशिचत करावयाच्या आहेत. हनुमाननगर झोन येथील स्टेशन सुरू करण्यात आले आहे. स्टेशन परिसरातील नागरिकांना कचऱ्याच्या दुर्गंधीपासून त्रास होणार नाही. यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया क रण्यात येणार आहे. याच धर्तीवर शहरातील इतर झोनमध्ये ट्रान्सफर स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका