शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दूषित भागाचे १०० टक्के निर्जंतुकीकरण होणार शक्य; नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकांचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:14 IST

पृष्ठभाग निर्जंतुकीकरणासाठी उपलब्ध असलेल्या पद्धती १०० टक्के कार्यक्षम नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगगपूर विद्यापीठातील चार प्राध्यापकांनी एकत्रित येऊन संशोधन केले व ‘मल्टिफोकल’ तसेच ‘ड्रोन’ आधारित निर्जंतुकीकरण यंत्राचा शोध लावण्यात यश मिळविले आहे.

ठळक मुद्दे‘ड्रोन’ आधारित यंत्राचा शोध

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या संकटकाळात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. पृष्ठभाग निर्जंतुकीकरणासाठी उपलब्ध असलेल्या पद्धती १०० टक्के कार्यक्षम नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नगगपूर विद्यापीठातील चार प्राध्यापकांनी एकत्रित येऊन संशोधन केले व ‘मल्टिफोकल’ तसेच ‘ड्रोन’ आधारित निर्जंतुकीकरण यंत्राचा शोध लावण्यात यश मिळविले. या दोन्ही संकल्पना पेटंटसाठी दाखल करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे चारही प्राध्यापक वेगवेगळ्या विद्याशाखांचे आहेत.भौतिकशास्त्र विभागातील डॉ.संजय ढोबळे, ‘एलआयटी’मधील रसायन अभियांत्रिकी विभागातील प्रा.भारत भानवसे, फार्मसीमधील डॉ.निशिकांत राऊत व डॉ.दादासाहेब कोकरे यांनी हे संशोधन केले. स्वतंत्र पद्धती वापरुन निर्जंतुकीकरणाच्या दोन किंवा अधिक पद्धतींचे संयोजन १०० टक्के कार्यक्षम आहे हे सिद्ध झाले आहे. १०० टक्के कार्यक्षमता साध्य करण्यासाठी एकाच यंत्रामध्ये दोन किंवा अधिक निर्जंतुकीकरण तंत्र एकत्र करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळेच अतिनील, रासायनिक आणि उष्णता निर्जंतुकीकरण पद्धतींसह ‘मल्टिफोकल’ निर्जंतुकीकरण यंत्र तयार करण्यात आले आहे. ‘लॉकडाऊन’मुळे या उपकरणांच्या बनावटीसाठी आवश्यक असलेली सामग्री उपलब्ध होऊ शकली नाही आणि म्हणूनच याला ‘पेटंट’साठी दाखल करण्यात आले आहे.अशी आहे संकल्पनारसायन आधारित निर्जंतुकीकरणात कमी प्रभावी आणि सहज उपलब्ध रासायनिक जंतुनाशक असतात. तसेच गरम हवेच्या धक्क्याने निर्जंतुकीकरण केले जाते. एका अहवालानुसार हा विषाणू तापमानात ५६ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात मारला जाऊ शकतो. म्हणूनच, १०० टक्के निर्जंतुकीकरणासाठी सध्याच्या प्रणालीमध्ये तापमानात ६० अंश सेल्सिअससह वायुचा उपयोग करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ‘मल्टिफोकल’ निर्जंतुकीकरणाचा उपयोग अतिनील प्रकाश, रासायनिक जंतुनाशक आणि गरम हवेसह युव्ही लाईट वापरुन केले जाते. ते पृष्ठभागापासून ५ ते १० फूट उंचीपर्यंत चालवले जाते. हे हाताळण्यासाठी सुरक्षित असून रुग्णालये, मॉल, दुकाने, कार्यालयात वापरता येऊ शकते.‘ड्रोन’मुळे धोका कमी‘ड्रोन’ आधारित रासायनिक निर्जंतुकीकरण यंत्राचा उपयोग विस्तृत क्षेत्रावर होऊ शकतो. विशेष म्हणजे मानवरहित नियंत्रण शक्य आहे व प्रत्यक्ष कुणाला स्पर्श करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संक्रमित भागांचे निर्जंतुकीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कमी धोका असतो, अशी माहिती या प्राध्यापकांनी दिली.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ