शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनावर १० हजार रुपये ‘कॉस्ट’

By admin | Updated: February 2, 2016 02:37 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात राज्य शासनावर १० हजार रुपये ‘कॉस्ट’ (दावा खर्च) बसवला.

हायकोर्टाचा आदेश : विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात राज्य शासनावर १० हजार रुपये ‘कॉस्ट’ (दावा खर्च) बसवला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. योगेश बगाती असे मृताचे नाव असून तो रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. योगेशचा अकस्मात मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा करून त्याचे वडील रोशनलाल बगाती यांनी याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. तपासावर लक्ष ठेवण्यासाठी प्रकरणावर नियमित सुनावणी निश्चित केली जात आहे. याचिकाकर्ते रोशनलाल जम्मू आणि कश्मीर येथील रहिवासी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. त्यांचे वकील एम.के. पंडित दिल्लीहून नागपूरला येतात. ७ डिसेंबर २०१५ रोजी त्यांनी हा प्रवास परवडत नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. यामुळे न्यायालयाने शासनाला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ३० जानेवारी २०१६ पर्यंत १० लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश देऊन सुनावणी १ फेब्रुवारी रोजी निश्चित केली होती. त्यानुसार हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी आले असता शासनाच्या वकिलाने १० लाख रुपये जमा करण्यासाठी आणखी एक महिना वेळ मागितला. यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन शासनावर १० हजार रुपये ‘कॉस्ट’ बसवला आणि रक्कम जमा करण्यासाठी एक महिन्याचा वाढीव वेळ मंजूर केला. ‘सीबीआय’तर्फे अ‍ॅड. एस.बी. अहिरकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)अशी आहे पार्श्वभूमीमयत योगेश शिक्षणासाठी नागपुरात रहात होता. १६ नोव्हेंबर २०१२ रोजी एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील राय टाऊन येथील एका घराच्या छतावर योगेश मृतावस्थेत आढळून आला होता. आदल्या रात्री त्याने मित्रांसोबत पार्टी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. यावर रोशनलाल यांचा आक्षेप आहे. पोलिसांनी गैरप्रकार केला आहे. कोणताही सबळ पुरावा नसताना योगेशचा मृत्यू विषामुळे झाल्याचा चुकीचा निष्कर्ष काढला आहे. योगेशच्या मोबाईलमधील महत्त्वाची माहिती खोडण्यात आली आहे. मित्रांचे बयान नोंदविण्यात आले नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे रोशनलाल यांचे म्हणणे आहे.