२१ सप्टेंबरला जागतिक अल्झायमर दिन : जनजागृतीसाठी निघणार रॅलीनागपूर : साठीनंतर मेंदूच्या कार्याचा हळूहळू ऱ्हास होत जातो. यात प्रामुख्याने मेंदूची महत्त्वाची कार्य स्मरणशक्ती बुद्धिमत्ता, हातापायाची हालचाल, रोजची कामे याचा विसर पडत जाणे, या सर्व गोष्टी हळूहळू वाढत जातात. निर्णयक्षमता कमी कमी होणे, कपाळावर असलेला चष्मा बाहेर शोधत बसणे, मेंदूतील पेशी एकदा नाश पावल्या की पुन: त्यामुळे बुद्धीचा ऱ्हास होत जातो. पुढील काळात तर लघवी, संडास यावरील नियंत्रणही जाते. पेशंट स्वत:लाही ओळखत नाही. देवळात जायला निघाल्यास आपणाला कुठे जायचे याचा विसर पडून रस्त्यातच उभा राहतो. ही स्टेज म्हणजे अल्झायमर होय. साधारण १० टक्के ज्येष्ठांमध्ये हा आजार दिसून येतो, अशी माहिती डॉ. अभिषेक सोमानी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.इंडियन सायकियाट्रिक सोसायटी व नागपूर न्यूरो सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ‘अल्झायमर दिन’ २१ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे, त्यानिमित्त या आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. डॉ. पवन अडतिया म्हणाले, डिमेन्शिया, अल्झायमर यांच्यासारख्या आजाराबाबत आपल्याकडे फारशी जागृती नाही. म्हतारपण झाले की स्मरण शक्ती कमी होतेच, हे गृहीत धरून सर्व व्यवहार चालतात, पण डिमेन्शिया या आजाराची लक्षणे दिसल्यास मुलांनी ज्येष्ठांना डॉक्टरकडे नेणे गरजेचे आहे. स्मृतिभ्रंश(डिमेन्शिया) या आजारात मेंदूची कार्यक्षमता कमी होते. यात स्मरणशक्ती बुद्धिमत्ता, एकाग्रता, भाषाकौशल्य व स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता मुख्यत: कमी होते. पेशंटची वर्तणूक व स्वभावातही बरेच बदल दिसतात. यात चिडचिडेपणा, हिंसक प्रवृत्ती, हट्टीपणा, दुर्लक्षिले गेल्याची भावना व त्यातून येणारे नैराश्य, आजाराच्या पुढच्या अवस्थेत किंवा उपचाराअभावी पेशंटला भास होणे, भ्रम होणे, झोपेचे वेळापत्रक बदलणे इत्यादी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दिसताच कुटुंबातील सदस्यांनी रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. परिषदेत डॉ. प्रबीर वराडकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)
१० टक्के ज्येष्ठांना ‘स्मृतिभं्रश’
By admin | Updated: September 19, 2014 00:52 IST