शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

१० लाखांचा ऐवज जप्त

By admin | Updated: August 11, 2016 02:24 IST

पोलिसांनी सतरापूर शिवार व कन्हान-चाचेर मार्गावरील पुलाजवळ केलेल्या दोन वेगावेगळ्या कारवाईमध्ये शिवारात

अवैध वाहतूक : १९ जनावरांची सुटका कन्हान : पोलिसांनी सतरापूर शिवार व कन्हान-चाचेर मार्गावरील पुलाजवळ केलेल्या दोन वेगावेगळ्या कारवाईमध्ये शिवारात केलेल्या कारवाईमध्ये जनावरांची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले. यात एकूण १९ जनावरांची सुटका करून आरोपींना अटक केली. या दोन्ही कारवार्इंमध्ये एकूण १० लाख ३१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कन्हान-चाचेर मार्गावरून जनावरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी या मार्गावरील पुलाजवळ रविवारी सकाळी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करायला सुरुवात केली. दरम्यान, एमएच-४९/डी-३२८४ क्रमांकाचा ट्रक अडवून त्याची तपासणी केली असता, त्यात १० गाई कोंबल्या असल्याने निदर्शनास आले. या गुरांची वाहतूक अवैध असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी सर्व जनावरे ताब्यात घेत वाहन जप्त केले आणि वाहनचालकास अटक केली. या कारवाईमध्ये तौसिफ इब्राहीम कुरेशी (३०, रा. भाजीमंडी, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ८८ हजार रुपये किमतीची जनावरे तसेच पाच लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण ५ लाख ८८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई सतरापूर शिवारात शुक्रवारी मध्यरात्री करण्यात आली. यात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली असता, एमएच-३५/के-४१०२ क्रमांकाच्या मालवाहू बोलेरोमध्ये नऊ जनावरे कोंबली असल्याचे आढळून आले. ही सर्व जनावरे कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट होताच पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून वाहनचालकास अटक केली. नौशाद वल्द मोहम्मद पठाण (२४, रा. कादर झेंडा, कामठी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून ४३ हजार रुपये किमतीचा जनावरे आणि चार लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण ४ लाख ४३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या सर्व जनावरांना नजीकच्या गो शाळेत ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी जनावरांना निर्दयतेने वागविण्याबाबतचा कायदा कलम ११ (अ) (ड) (इ) (फ) तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ सहकमल ५ (अ), १, २, ९ अन्वये गुन्हा नोंदविला असून, या दोन्ही घटनांचा तपास सहायक पोलीस निरीक्षक विजय पोटे करीत आहेत. (प्रतिनिधी)