शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

१० दिवस पाणी संकट

By admin | Updated: November 19, 2014 00:49 IST

गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे.

गोरेवाडा तलाव : पातळी ३१२.५० मीटरवरनागपूर : गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागातील नागरिकांना पुढील दहा दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अकस्मात उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.शहराच्या ६५ टक्के भागाला गोरेवाडा तलावातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु तलावाला पुरवठा करणाऱ्या नवेगाव- खैरी प्रकल्पाचा उजवा कालवा फुटला आहे. या महिन्यात दोनदा हा कालवा फुटला. कालव्याला वारंवार मोठमोठे भगदाड पडत असल्याने गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट झाली आहे. यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सद्यस्थितीत तलावतील पाणी पातळी ३१२.५० मीटरपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे शहराच्या बहुसंख्य भागाला मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे. गोरेवाडा तलावाची पातळी साधारणपणे ३१३ मीटर असली आणि तलावाला कालव्यावदारे ४३० ते ४४० एमएलडी पाणी पुरवठा झाला तरी शहराला पुरेसा पाणी पुरवठा करता येतो. परंतु पेंच -नवेगाव खैरी धरणाच्या ७ कि.मी.अंतरावर बाभूळखेडा गावाजवळ उजवा कालवा फु टल्याने पाटबंधारे विभागाने कालव्यातील पाणी प्रवाह १३ नोव्हेंबरपासून बंद केला आहे. नवेगाव खैरी धरणावरून आरबीसीमध्ये पाणी वळविण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कालव्याचा प्रवाह थांबल्याने गोरेवाडा तलावातील पाणी पातळी पूर्णपणे कमी झाली आहे. १४ नोव्हेंबरला गोरेवाडा तलावाची पाणी पातळी ३१३.१४ मीटर होती. १५ नोव्हेंबरला ती ३१२.८८ मीटर, १६ तारखेला ३१२.४० तर १७ व १८ नोव्हेंबरला ती ३१२.५० मीटरपर्यंत खाली गेली आहे. ३१ आॅक्टोबरला पेंच नवेगाव खैरी प्रकल्पाच्या १९ कि.मी. अंतरावर राईट बॅक कॅनल पाटणसावंगीजवळ एका ठिकाणी फुटला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ३१ आॅक्टोबरच्या संध्याकाळपासून पाण्याचा प्रवाह बंद करावा लागला होता. परिणामी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. सद्यस्थितीत गोरेवाडा तलावातील पाणी पातळी ३१२.५० मीटर आहे. १९ नोव्हेंबरला ती ३१२.६० मीटर होण्याची शक्यता आहे. तरीही पुढील १० दिवस शहराच्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागाचा पाणी पुरवठा बाधित राहणार आहे. दुरुस्तीनंतर पाटबंधारे विभाग महादुला येथून दररोज पूर्णक्षमतेने ४५० एमएलडी पाणी उचलून गोरेवाडा तलावाच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतरही तलावाच्या पातळीत जेमतेम ४ ते ५ से.मी. पाण्याची वाढ होत आहे. टंचाईमुळे गैरसोय होत असली तरी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे. (प्रतिनिधी)