शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
2
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
3
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
4
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
5
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
6
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
7
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
8
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
9
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
10
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
11
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
12
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
13
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
14
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
15
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
16
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
17
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
18
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
19
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
20
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!

वाचनाची रूची वाढवण्यासाठी पुस्तकांची गाडी दारोदारी; लेट्स रीड इंडिया फाउंडेशन कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 02:08 IST

वाचन चळवळीचा श्रीगणेशा

मुंबई : समाजामध्ये वाचनाची गोडी वाढावी. वाचनाची रुची वाढावी. गरजूंपर्यंत पुस्तक पोहोचावीत. मुळात पुस्तके का वाचावीत. कोणती पुस्तके वाचावीत. पुस्तके कशी वाचावीत; याची माहिती देण्यासह खेड्यापाड्यातल्या प्रत्येकापर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी लेट्स रीड इंडिया फाउंडेशन कार्यान्वित झाले असून, फाउंडेशनने मुंबई महानगर प्रदेशात (रायगड) वाचन चळवळीचा श्रीगणेशा केला आहे.

लोकांनी प्रामाणिकपणे वाचन करावे हा या चळवळीचा उद्देश असून, समाज माध्यमांवर लेट्स रीड इंडिया फाउंडेशनला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चळवळीचे श्रेयही फाउंडेशनने वाचकांना दिले असून, मुंबईतही लवकरच पुस्तकांची गाडी दारोदारी दाखल होणार आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून हे फाउंडेशन सुरू करण्याचे नियोजन होते, पण प्रत्यक्षात गेल्या ३ वर्षांपूर्वी हे फाउंडेशन कार्यान्वित झाले. प्रारंभी अभ्यासक्रमाव्यतिरिक्तची पुस्तके गरजू, गरीब मुलांना देण्यात आली.

जानेवारी २०२० मध्ये ट्रस्ट स्थापन झाले; आणि मग समाज माध्यमांवर मोठ्या वेगाने काम सुरू झाले. वाचनसंस्कृती वाढविण्यासाठी पहिल्या टप्प्याच्या कामास सुरुवात झाली. लोकांनी वाचावे. कारण लोकांनी वाचले तर आपली प्रगती आहे, यावर लेट्स रीड इंडिया फाउंडेशन ठाम आहे. आता संपूर्ण देशभर पुस्तकांची ही चळवळ उभी करण्याचा मानस आहे. सुरुवातीला तीन राज्यांत म्हणजे महाराष्ट्र, गोवा आणि मध्य प्रदेशात ही चळवळ सुरू होणार होती. मात्र कोरोनामुळे सुरुवातीला महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात ‘ग्रंथालय आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. आता नवी मुंबईसह लगतच्या प्रदेशात पुस्तकाची गाडी दारोदारी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन वर्षांत ही चळवळ पूर्ण राज्यात उभी केली जाणार आहे. आता पहिल्या टप्प्यात समाज माध्यमांवर उपक्रमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचविली जात आहे.

हे साधेसुधे ग्रंथालय नाही. ही पुस्तकाची गाडी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असून यात जीपीएस, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम, बारकोड सिस्टीम आहे, हे सर्व आपण आपल्या मोबाइल किंवा कॉम्प्युटरवरून वापरू शकतो. लेखक, पुस्तक प्रकाशन संस्थांनाही पुस्तकांची मदत होईल अशा पद्धतीने पुस्तकांची गाडी कार्यान्वित आहे.

पुढील महिन्यात पुस्तकाची दुसरी गाडी आणण्याचा विचार आहे. सध्या एक गाडी ५० किलोमीटरच्या परिसरात फिरत आहे. वाचकांना पुस्तक वाचण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी देण्यात येत आहे. विशेषत: पुस्तक वाचण्यासाठी शुल्क आकारण्यात येत नाही.

1वाचकांना कोणती पुस्तके वाचण्यास आवडतील? याची माहिती विविध माध्यमातून गोळा केली जात आहे. विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक, आर्थिक, राजकीय, बालसाहित्य, संतवाङ्मय, कविता, आत्मचरित्र, स्त्रीहक्क आणि समानता, विविध अनुवादित तसेच अनेक अशी वेगवेगळी पुस्तके वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

2आतापर्यंत ५ हजार पुस्तके खरेदी करण्यात आली आहेत. एका गाडीत २ हजार पुस्तके मावत असून, यातील अद्ययावत सॉफ्टवेअर हे मोठ्या प्रमाणात स्केलेबल असून लाखो पुस्तकांचे आदानप्रदान करण्यास आणि गाड्या चालविता येण्यास सक्षम आहे.

3सदर ग्रंथालय हे जगातील अद्ययावत अशा प्रकारात मोडणारे आहे. भविष्यात यूट्युब चॅनलही सुरू करण्यात येणार असून त्याद्वारे तज्ज्ञांतर्फे वाचनाचे धडे दिले जातील.

अनाथ मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गरीब-होतकरू विद्यार्थी, नोकरी-सरकारी नोकरीसाठी अभ्यास करणारी तरुण मुले, वाड्यावस्तीवरील मुलांपर्यंत पहिल्यांदा पुस्तके पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्यांना खरी गरज आहे, जे पुस्तक विकत घेऊ शकत नसतील किंवा जे पुस्तक आणण्यासाठी बाहेर पडू शकत नसतील किंवा ज्या परिसरांत वाचनालय नसेल त्यांच्यापर्यंत पुस्तक वाचण्यासाठी पोहोचते केले जाणार आहे.

टॅग्स :Mumbaiमुंबई