नवरा बायकोमध्ये सकाळी सकाळी खूप मोठं भांडण झालं.. संपूर्ण दिवस कोणीच कोणाशी बोलेना...
संपूर्ण घरात स्मशान शांतता... दोघेही माघार घ्यायला तयार नाहीत...
रात्री बायको नवऱ्याजवळ आली..
बायको- अशा प्रकारे वाद घालणं चांगलं नाही.. आपण दोघांनी मिळून भांडण सोडवायला हवं... थोडं तुम्ही समजून घ्या.. थोडं मी घेते...
नवरा- म्हणजे..? नेमकं काय करायचं..?
बायको- तुम्ही माझी माफी मागून टाका... मी लगेच माफ करते...